मुंबई

खोपोली-खालापुरातून आंदोलनाला पाठींबा

CD

मुंबईतील आंदोलकांसाठी कर्जतमधून शिदोरी
आर्थिक मदतीसह जेवणाची व्यवस्था, लढ्यात उत्स्फूर्त सहभाग
कर्जत, ता. ३१ (बातमीदार)ः रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा मराठा आरक्षणाच्या लढ्यात सातत्याने सिंहाचा वाटा उचलत आहे. याच अनुषंगाने शनिवारी (ता. ३०) सकाळी कर्जतमधील समाजबांधवांनी आंदोलकांसाठी शिदोरी थेट मुंबईकडे रवाना केली आहे.
मराठा आरक्षणासाठी कर्जतमधील समाजबांधवांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जतमधून आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. याच अनुषंगाने आंदोलकांसाठी जेवणासाठी भाकऱ्या देण्याचे आवाहन करण्यात आले होते. विविध स्तरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शनिवारी संध्याकाळी ४.५७ च्या लोकलने जमा केलेली शिदोरी मुंबईकडे रवाना झाली. तसेच अवघ्या काही तासांतच क्यूआर कोडच्या माध्यमातून लाखभर रुपयांची आर्थिक मदत जमा झाली असून मदतीचा ओघ सुरू असल्याचे समन्वयकांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या लढ्यात कर्जतकरांचा अग्रेसर सहभाग नेहमीच राहणार असल्याचे सांगितले.
-----------------------------------------
आंदोलनाला वाढता पाठिंबा
खोपोली (बातमीदार)ः खोपोली, खालापूर तालुक्यातून मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला वाढता पाठिंबा आहे. मोठ्या संख्येने आंदोलक लोकलने मुंबईतील आझाद मैदानाच्या दिशेला रवाना होत आहेत. तसेच मराठा बांधवांसाठी पाणी, जेवण, भाकऱ्या पाठवली जात असून तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वरिष्ठ कार्यकर्ते, नेते पक्षीय मतभेद बाजूला ठेवून समाजासाठी एकत्र आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT