मुंबई

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच

CD

दहाव्या दिवशीही मागण्यांवर ठाम
कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू
अलिबाग, ता. ३१ (वार्ताहर)ः राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ६१२ हून अधिक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. २०)पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विविध मागण्यांबाबत शासनासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने दहाव्या दिवशीही आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याने आरोग्य सेवा विस्कळित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सरकारी सेवेतील समावेशासह विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ६१२ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग, लसीकरण, औषध वितरणावर परिणामाची शक्यता आहे. सध्या डायलिसिस, नवजात शिशू कक्ष विभागांतील अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु दोन दिवसांत शासनाकडून निर्णय झाला नाहीतर सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती, रायगडचे अध्यक्ष विकास धुमाळ यांनी दिली.
-----------------------------------------------
आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी कर्मचारी दोन सरकारी रुग्णालयांत नियमित कर्मचाऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात; परंतु त्यांना पगार कमी मिळतो. केवळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तीन आणि चालकांचेच समायोजन करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, या मागणीसाठी दोन वेळा शासनासोबत बैठक झाली; मात्र कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने आरोग्य सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
--------------------------------
कामाचा ताण वाढला
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणारे कर्मचारी संपावर गेल्यामुळे नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे; परंतु रुग्णांची सेवा अखंडित सुरू असल्याचा दावा जिल्हा आरोग्य प्रशासनाने केला आहे; मात्र या प्रकरणात त्वरित तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांचा मोठा निर्णय! कोर्टातील ‘काळे कोट’ संपणार? नावही बदलणार, मोठा बदल लवकरच!

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या तपोवन वृक्ष तोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Beed Forest Department News: वन विभागात टक्केवारीचा खेळ; बोगस बिलांमुळे कोट्यवधींचा गैरव्यवहार?; सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा आरोप

Deepak Dalvi Death : मराठी अस्मितेचा ढाण्या वाघ हरपला! म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन; काही महिन्यांपूर्वीच शरद पवार, जयंत पाटलांनी घेतली होती भेट

LPG Cylinder Shortage : सिलिंडर मिळणे कठीण! इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगड्या वापरा, मोदी सरकारचे जनतेला आवाहन

SCROLL FOR NEXT