मुंबई

अपघातग्रस्तांसाठी पेणचा संकटमोचक

CD

महामार्गावरील अपघातग्रस्तांचा रक्षणकर्ता
पेणच्या कल्पेश ठाकूरकडून विनामूल्य रुग्णवाहिका
पेण, ता. ३१ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर रात्री-अपरात्री होणाऱ्या अपघातांमधील जखमींचा उपचारांअभावी मृत्यू होत असल्याचे अनेक प्रकार घडतात. अशा संकटकाळात पेणमधील कल्पेश ठाकूरने विनामूल्य रुग्णवाहिकेद्वारे हजारो जणांना जीवदान दिले आहे.
महामार्गावर झालेल्या अपघातात कल्पेश ठाकूरच्या मित्राचा उपचारांअभावी मृत्यू झाला होता. या घटनेचे शल्य मनात कायम असल्याने महामार्गावर कोणत्याही ठिकाणी झालेल्या अपघातात तातडीने मदतकार्य पोहोचवण्याचे ध्येय त्याने उराशी बाळगले आहे. यातूनच मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या हजारो अपघातग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे काम त्याने केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर छोट्याशा साई सहारा हॉटेलपासून केलेली सुरुवात आज आंबिवली फाट्यावर थ्री स्टार हॉटेल थाटले आहे. या हॉटेलच्या माध्यमातून अनेकांना अन्नदान केले आहे. गेल्या २०-२२ वर्षांपासून महामार्गावरील अपघातग्रस्तांना तत्काळ मदतदेखील पोहोचवत आहे.
--------------------------------------------
विविध पुरस्कारांचा मानकरी
कोरोनाकाळात अनेक कुटुंबांना मायेचा आधार कल्पेशने दिला होता. त्याच्या अहोरात्र सेवेमुळे पोलिस प्रशासनाला मोठी मदत होत असून याच सामाजिक बांधिलकीमुळे आमदार, खासदार, विविध खात्यांचे मंत्री, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांसह असंख्य सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांतील विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

Stock Market Today: युद्धातही शेअर बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 450 अंकांनी वाढला; कोणते सेक्टर तेजीत?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सत्ता समीकरणात मोठी उलथापालथ, भाजप अध्यक्षपदाच्या दिशेने

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

SCROLL FOR NEXT