मुंबई

भालगाव वाडीतील आदिवासी कुटुंबांवर हल्ला

CD

भालगाव वाडीतील आदिवासी कुटुंबावर हल्ला
नऊ आरोपींना न्यायालयाने दिली पाच दिवसांची कोठडी
मुरुड, ता. ३१ (वार्ताहर) : रोहा तालुक्यातील भालगाव येथील आदिवासी वाडीत मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. मिठागर येथील नऊ जणांनी आदिवासी कुटुंबातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने या नऊ आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही घटना २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली. सुमित वाघमारे हे गणपती दर्शनासाठी मिठागर येथील एका मुलीच्या घरी गेले होते. या गोष्टीचा राग मनात धरून मिठागर येथील आरोपींनी जमावासह भालगाव आदिवासी वाडीत येऊन वाघमारे कुटुंबाला लक्ष्य केले. सुमित वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्या पत्नी संगीता वाघमारे, मुलगा साहील वाघमारे आणि काका चंदर श्रावण वाघमारे यांनाही मारहाण केली. चुलत भाऊ रामचंद्र वाघमारे यांच्याही डोक्यावर आघात करण्यात आला, तसेच त्यांच मुलगा सागर वाघमारे याच्या उजव्या पायावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केली. या घटनेची माहिती मिळताच मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने मुरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी सुमित वाघमारे यांच्या तक्रारीवरून दीपेश कृष्णा ठाकूर, विजय विठ्ठल पाटील, परेश कृष्णा ठाकूर, विराज विजय ठाकूर, करण विठोबा चिपकर, सुजय संतोष शहापूरकर, दीपेश दत्ताराम माळी, विनिते विजय ठाकूर आणि सागर पांडुरंग ठाकूर (सर्व राहणार मिठागर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अलिबाग रायगड उपविभागीय पोलिस अधिकारी माया मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले, मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंनी केली 'त्या' घोषणेची आठवण

CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर तुळजाभवानी मातेची आरती, तुळजापूरात आनंदोत्सव

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Latest Marathi News Updates: मनोज जरांगेंच्या कुटुंबियांनी साजरा केला आनंद

SCROLL FOR NEXT