मुंबई

गडकरी रंगायतनच्या कोनशिलासाठी ठाकरे गट आक्रमक

CD

गडकरी रंगायतनच्या कोनशिलासाठी ठाकरे गट आक्रमक
आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ ः ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या गडकरी रंगायतनचे उद्‍घाटन थाटात पार पडले. मात्र, नूतनीकरणाचा घाट घालताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्‍घाटन झालेली कोनशिला दर्शनी भागातून हटवली आहे. यावरून सुरू झालेले राजकारण अजूनही थंड झालेले नसून ठाकरे गटाने आता आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गावदेवी मैदानातील भरसभेत एका ठाणेकरांनी एक चिठ्ठी पाठविली. त्यामध्ये नाट्यगृह व स्टेडियमची मागणी केली होती, त्या चिठ्ठीवर तात्काळ प्रतिक्रिया देत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्ता द्या तुम्हाला नाट्यगृह व स्टेडियम देतो, असे आश्वासन ठाणेकरांना दिले आणि ठाणेकरांनी शिवसेनेला पहिली सत्ता दिल्यानंतर बाळासाहेबांनी शब्द पूर्ण केला. १५ डिसेंबर १९७८ रोजी राम गणेश गडकरी रंगायतन उद्‍घाटन बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर १४ मार्च १९९९ रोजी पुन्हा या वास्तूचे नूतनीकरण करून त्यांच्याच हस्ते पुन्हा उद्‍घाटन झाले. यावेळी त्यांच्या नावाची पाटी (कोनशिला) बसविण्यात आली होती. आजतागायत ही कोनशिला ठाणेकर रसिक आणि नाट्यप्रेमींना दिसेल अशी दर्शनी भागात होती. मात्र, आता गडकरी रंगायतनचे नूतनीकरण केल्यानंतर ही कोनशिला दर्शनी भागातून हटवून कोपऱ्यात लावली आहे. त्यामुळे शिवसैनिकांच्या आणि ठाणेकरांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. ही कोनशिला पुर्वीप्रमाणेच दर्शनी भागात लावावी, अशी मागणी केली आहे. कोनशिला दर्शनी भागात न लावल्यास आंदोलनाचा इशाराही विचारे यांनी आयुक्तांना दिला आहे.

आठ दिवसांची मुदत
उद्‍घाटनानंतर अडगळीत गेलेली कोनशिला आठ दिवसाच्या आत ही कोनशिला दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा पालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT