मुंबई

अपघात प्रवण स्थळांच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी रुपये खर्चाचा घाट

CD

अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींचा खर्च
जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
मनोर, ता. ३१ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर जिल्हा मार्गांवरील अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या आदेशाने जिल्हा नियोजन समितीने २० अपघातप्रवण स्थळांच्या सर्वेक्षणासाठी हे पैसे मंजूर केले आहेत; मात्र या मोठ्या खर्चावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सर्व्हेक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील वीस अपघात प्रवण स्थळे निश्चित करण्यात आली असुन एका अपघात प्रवण स्थळासाठी साडे पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांचे मूल्यमापन, संनियंत्रण व डाटा एन्ट्री करण्याच्या लेखशीर्षा अंतर्गत एका कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता क्रमांक दोन यांच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनात सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले आहे

सुरू कामाचाही सर्व्हेक्षणात समावेश
मुंबईतील टनडोन अर्बन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडला ४ मार्च २०२४ रोजी कार्यादेश देण्यात आले होते. वर्षभरात ठेकेदार कंपनीने सर्व्हेक्षण करून तयार केलेला अहवाल नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोपवण्यात आला आहे. दरम्‍यान, मंजूर केलेली रक्कम खूप जास्त असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाटा आणि सातिवली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपूल उभारणीचे काम आधीच सुरू झाले होते, त्या ठिकाणांचाही या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सर्वेक्षण केलेल्या ठिकाणांचा तपशील :
* मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग : जव्हार फाटा, हालोली, वाडा खडकोना, सातिवली, वरवाडा, वडवली, इभाड पाडा, आरटीओ चेक पोस्ट, मेंढवन, चारोटी ब्रिज नाका (एकूण १० ठिकाणे).
* पालघर-सिन्नर राष्ट्रीय महामार्ग : भोपोली, कासट वाडी (एकूण २ ठिकाणे).
* राज्यमार्ग : कुडूस, सापने, माहीम-रेवाळे वळण, कुरगाव-पास्थळ, सफाळे घाट, मान-महागाव-वरांगडे विराज कंपनी परिसर, गुंदले वाघोबा घाट, बिरसा मुंडा चौक खैरापाडा रेल्वे ब्रिज ते मुथूट नाका-सरावली (एकूण ८ ठिकाणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Gudi Padwa Decoration 2026: गुढी पाडव्याला ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा, घरात कधीच भासणार नाही कोणतीही कमतरता

Hasan Mushrif Satej Patil Friendship: मंत्री मुश्रीफांचा फोन, सतेज पाटील यांची साथ; बाहूरन विरोध आतून मदत, गोकुळची राजकीय पेरणी

SCROLL FOR NEXT