मुंबई

गौराईने घेतला आरोग्यदायी वसा

CD

गौराईने घेतला आरोग्यदायी वसा
उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एक हजार ५३८ महिलांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ ः ठिकठिकाणी लाडक्या गौराईचे आगमन रविवारी (ता. ३१) झाले असून, तिचे लाड पुरवण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानाला आतापर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. या अभियानांतर्गत गेल्या तीन महिन्यांत ठाणे महापालिकेने घेतलेल्या १० शिबिरांमध्ये एक हजार ५३८ महिलांनी सहभाग घेत निरोगी आरोग्याचा वसा घेतला.
नोकरी, घर, कुटुंब अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. लहानसहान आजार अंगावर काढण्याच्या सवयीमुळे महिलांमध्ये गर्भाशय आणि स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबाची काळजी घेताना थोडा वेळ स्वत:साठी काढून आरोग्यदायी आयुष्याचा विचार करण्यास प्रोत्साहन देणारी उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान ठाणे महापालिकेने सुरू केले आहे. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्‍घाटन झाले.
रोटरी क्लबच्या सहकार्याने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पूर्वनियोजन करून टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी गर्भाशय निदान करण्याचे शिबिर घेतले. याशिवाय रक्तातील हिमोग्लोबिन, साखरेचे प्रमाण तपासण्यात आले. केवळ तपासण्या नव्हे तर आरोग्यदायी जीवनशैली कशी असावी याचे मार्गदर्शन करणाऱ्या शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांच्या नियोजनबद्ध आखणीतून हा उपक्रम राबवला आहे.

गर्भाशय कर्करोगाची तपासणी
गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आतापर्यंत १० शिबिरांचे आयोजन करून सुमारे एक हजार ५३८ महिलांची तपासणी करण्यात आली. मुंब्य्रात एकाच दिवशी सुमारे २१६ महिलांनी तपासणी केल्याची नोंद आहे. त्यामध्ये २० महिला संशयित आढळल्या असून, पुढील तपासणीसाठी आवश्यक नमुने पाठवल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत एकाही महिलेला कर्करोगाचे निदान झाले नाही.

एक हजार मुलींचे लसीकरण
कर्करोगापासून बचाव करण्यासाठी एचपीव्ही लसीकरणाची मोठी मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. अत्यंत महागडी असलेली ही लस पालिका मोफत देत आहे. पालिका शाळांमधील एक हजार विद्यार्थिनींचे लसीकरण या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. आतापर्यंत ९ ते १४ वयोगटातील १५० मुलींचे लसीकरण करण्यात आले आहे. गणपती सुट्टीनंतर उर्वरित विद्यार्थिनींचेही लसीकरण करणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : अद्भूत! सौदी अरेबियात ११५० फूट उंचीवर उभारलं जातंय "sky stadium”, २०३४ च्या Fifa World Cup ची तयारी

Kolhapur Politics : असला सरपंच आम्हाला नको!, कोल्हापुरातील 'या' गावाने थेट संरपंचांविरोधात अविश्वास ठरावासाठी केलं मतदान

Latest Marathi News Live Update : दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा स्वतःवर चाकूने वार

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

World Cup 2025: प्रतिका रावलला नेमकं काय झालं, तिच्या जागेवर कोण खेळणार? BCCI ने अखेर दिले महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT