मुंबई

आता ठाणे पोलिसांकडून प्रभावी व्हाट्स अप्प चॅट बॉटची अंमलबजावणी

CD

ठाणे पोलिसांकडून चॅटबॉटची प्रभावी अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : ठाणे शहर पोलिस दल अधिकाधिक जनताभिमुख करण्याच्या उ‌द्देशाने व पोलिसांच्या विविध सेवा/उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्याच्या दृष्टीने ठाणे शहर पोलिसांचे अधिकृत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हॉट्सॲप चॅनल इत्यादी समाज माध्यमांद्वारे प्रभावीपणे वापर सुरू आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.
व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या या सेवेसाठी ७०३९४५५५५५ हा मोबाईल क्रमांक दिला असून त्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना ऑनलाईन तक्रार, आपत्कालीन संपर्क क्रमांक, ई-चलन पेमेंट, सायबर गुन्हा, हरविलेली/सापडलेली वस्तू, भाडेकरू नोंदणी, जवळचे स्थानिक पोलिस ठाणे, लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स, भारतीय नागरिक संहिता/भारतीय नागरिक सुरक्षा संहिता/ भारतीय साक्ष अधिनियम यांची कलमांची माहिती, अभिप्राय द्या, आपले सरकार सेवा या सेवा मिळणार आहेत. नुकतेच या सेवेचे उद्‍घाटन ठाणे शहर सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती शैलेश साळवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

PM Modi Reaction on GST Reform : ‘’मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, की..’’ ; GST 'रिफॉर्म'वर मोदींची पहिली प्रतिक्रिया!

Asia Cup 2025 साठी कर्णधार सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या दुबईला रवाना; कुठे करणार सराव, काय आहे वेळापत्रक; घ्या जाणून

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर काही लोकल रद्द, का आणि कधी? जाणून घ्या

Latest Marathi News Updates: हवामान विभागाकडून नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT