मुंबई

भारती विद्यापीठात मराठा आंदोलकांसाठी निवास व्यवस्था

CD

भारती विद्यापीठात मराठा आंदोलकांसाठी निवास व्यवस्था
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेल्या मराठा समाज बांधवाना भारती विद्यापीठाकडून निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला आहे. या आंदोलनात राज्यातील विविध भागातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे आंदोलकांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या माध्यमातून भारती विद्यापीठात भोजन आणि निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सांगली असो व राज्यातील इतर भागातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची स्वर्गीय पतंगराव कदम हे आपुलकीने चौकशी करीत असे, त्यांनी समाजासाठी केलेले काम आजही जिवंत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी त्यांनी हजारो बांधवांसाठी निवास-भोजन व्यवस्था केली होती. त्याच वाटेवर चालत ही जबाबदारी स्‍विकारली आहे. या उपक्रमात प्राचार्य डॉ. विलास कदम, प्राध्यापक, कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT