मुंबई

लक्झरी बसला अपघात; ८ प्रवासी जखमी

CD

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खासगी बसला अपघात
आठ प्रवासी जखमी; जीवितहानी नाही
कासा, ता. ३१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी पुलाजवळ रविवारी (ता. ३१) दुपारी खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी टळली असली तरी बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. यातील सहा जण मुंबईचे तर दोघे भिवंडीतील प्रवासी आहेत.
अपघातानंतर महामार्ग पोलिस व प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केली. बसमालकाने प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी तत्काळ पर्यायी बस पाठवल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळित झाल्यानंतर ती पुन्हा सुरळीत करण्यात आली. या अपघाताची नोंद कासा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असलेली खासगी बस समोरील एका अज्ञात ट्रकला धडकली. महामार्गावरील खड्ड्यांमुळे ट्रकने अचानक वाहन थांबवल्याने मागून येणाऱ्या बसची जोरदार धडक बसली. या धडकेत बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका, क्रेन आणि कासा पोलिसांचे डायल-११२ पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदान्त रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्‍यान, महालक्ष्मी उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे व उंचवटे असून, त्याकडे महामार्ग प्राधिकरण पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वारंवार अपघात घडून प्रवाशांचे जीव धोक्यात येत असून, वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

जखमी प्रवासी
लावण्या खत्री (वय १६, मुंबई), महेंद्रसिंग (वय ३८, मुंबई), रेखा खत्री (वय ३८, मुंबई), श्री. खत्री (वय ४८, मुंबई), कुसुम पुरोहित (वय ४५, भिवंडी), पूर्वा कुमार (वय ४५, भिवंडी), प्रणिता खत्री (वय २४, मुंबई), प्रियांका कुमार (वय १३, मुंबई)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT