मुंबई

जिल्ह्यात घरोघरी गौराईचे उत्‍साहात पूजन

CD

जिल्ह्यात घरोघरी गौराईचे उत्‍साहात पूजन
अलिबाग, ता. १ (वार्ताहर) ः गणरायाच्या आगमनानंतर रायगड जिल्ह्यात सोमवारी (ता. १) घरोघरी मूर्तीच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौराईचे महिलांनी मनोभावे पूजन केले.
गौरी माहेरपणासाठी घरी येतात. यासाठीच शेतकरी महिला खास पारंपरिक स्वयंपाक करून त्यांचे कौडकौतुक करतात, अशी श्रद्धा आहे. रविवारी गौरींचे आगमन, सोमवारी पूजन आणि आज मंगळवारी (ता.२) विसर्जन होणार आहे.
अलिबाग तालुक्यातील चिंचोटी येथे डोंगरावरून गौरी आणल्या जातात. पारंपरिक भाजी भाकरीचा नैवेद्य, भेंड या झाडाच्या फुलांनी गौरीपूजन अशा पद्धतीने हा सण खेडोपाडी साजरा केला जातो. माहेरी आलेल्या गौरीला निरोप देताना पौराणिक आख्यान गीतांवर नृत्य करून करण्याची प्रथा अलिबाग तालुक्यातील मल्याण या गावात गेली अनेक वर्षे सुरू आहे. ग्रामदेवतेच्या पुढे गौरीची प्रतिमा डोक्यावर घेऊन पुरुष गौरीकथा आणि महात्म्य उपस्थितांपुढे मांडतात आणि नंतरच नदीत तिचे विसर्जन केले जाते. गौरीचे वर्णन कृषी संस्कृतीच्या विलोभनीय गीतांमधून केले जाते. कुंतीने हे व्रत केल्याचेही या गीतांमधून सांगितले जाते. भेंडीच्या झाडांना फुले येतात, नद्या भरून वाहत असतात तेव्हा गौरीचे आगमन होते, असे वर्णनही या वेळी गायलेल्या गीतांमधून व्यक्त होते. गौरी – गणपती असे आई-मुलाचे नाते या उत्सवाच्या निमित्ताने घरोघर जागते केले जाते. गौराई म्हणजे पार्वती ही सृष्टीची जननी आहे. पार्वतीचे रूप कुलदेवतेच्या रूपात पुजले जाते. कूल वंश वाढावा म्हणून गौरी पूजनाला नवविवाहिता पाच प्रकारची फळे, पाच प्रकारची पाने, नारळ, विडा, साडी आणि जंगलातील फळा फुलांनी गौराईचे पूजन करतात. गौराईला नऊवारी साडी नेसून नवविवाहीता आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी देवीला नवस करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगेंचे उपोषण यशस्वी ! जीआर मिळताच गुलाल उधळणार; रात्रीपर्यंत मुंबई सोडणार

Modi Lipi : मोडी लिपी कुठे शिकायची? शिकायला किती दिवस लागतात अन् फायदे काय..जाणून घ्या

Manoj Jarange: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटला मान्यता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार

Latest Marathi News Updates: आज मनोज जरंगे मुंबई सोडणार

Maratha Reservation: कुठल्या अधिकाराने तिथे बसला आहात? हायकोर्टाचा मनोज जरांगेंना सवाल, सरकारवरही ताशेरे; वाचा सुनावणीदरम्यान काय घडलं?

SCROLL FOR NEXT