मुंबई

शिक्षिकेच्या घरी चोरी

CD

शिक्षिकेच्या घरी चोरी; दीड लाखाची चोरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : खासगी शाळेच्या शिक्षिकेचे बंद घर फोडून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एकूण दीड लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज चोरी झाला असून, याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलम चव्हाण या ठाण्यातील एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत. शाळेला गणेशोत्सवानिमित्ताने सुट्ट्या असल्याने नीलम मुलांना घेऊन ठाण्यातील आझादनगर येथील आईच्या घरी गेल्या होत्या. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांना सेफ्टी दरवाजाचे कुलूप आणि आतील दरवाजाची कडीकोंयडा तुटलेला दिसून आला. घरातील हॉलमधील लोखंडी कपाट उघडे दिसले. त्या कपाटातील ८८ हजारांचा सोन्याचा २२ ग्रॅम वजनाचा हार, ४० हजारांची सोन्याची १० ग्रॅम वजनाची चेन आणि रोख ३० हजार असा एक लाख ५८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पोबारा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Women Doctor Death : घरमालकाच्या मुलाला पुण्यातून अटक, PSI बदनेच्या लोकेशनबाबत मोठी माहिती समोर

Video Viral: पाकिस्तान क्रिकेट लीगची इभ्रत चव्हाट्यावर; PCB ने पाठवलेली नोटीस संघ मालकांनी कॅमेऱ्यासमोर फाडली

Kolhapur Family Attack : इचलकरंजीत फटाके उडवत असताना हल्ला; जर्मनी गँगकडून पती, पत्नी आणि मुलावर कोयत्याने सपासप मारलं अन्

BMCसाठी भाजपचा दीडशे पारचा नारा अन् शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; कारण काय?

Satara Doctor Case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; प्रशांत बनकरला घेतलं ताब्यात, आरोपींना फाशीची मागणी

SCROLL FOR NEXT