मुंबई

डिजिटल ठगांचे उल्हासनगरात जाळे

CD

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगरात पुन्हा एकदा डिजिटल गुन्हेगारांनी नागरिकांचा थरकाप उडवणारी कारस्थाने रचली आहेत. “तुमच्या आधार कार्डाचा गैरवापर करून ८१ कोटींची फसवणूक झाली आहे. आता तुम्हाला अटक होणार, पोलिस मारहाण करून पायात खिळ ठोकतील आणि बर्फावर झोपवतील, अशा धमक्या देत एका व्यक्तीकडून तब्बल तीन लाख रुपये उकळण्यात आले. मुंबई पोलिसांच्या नावाखाली घडवून आणलेली ही घटना डिजिटल ठगांच्या वाढत्या जाळ्याचे वास्तव समोर आणणारी ठरली आहे.
उल्हासनगरातील एका व्यक्तीला डिजिटल गुन्ह्याच्या सापळ्यात अडकवून एकाने ६१४०९२६५०२७ या क्रमांकावरून संपर्क साधला. त्यानंतर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला मुंबई पोलिस असल्याचे भासवले. पीडितेला सांगितले, नरेश नावाच्या व्यक्तीने त्याच्या आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाचा वापर करून ८१ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, ताबडतोब अटक होणार आहे. याचबरोबर त्याने ‘पोलिस तुला मारहाण करतील, पायात खिळ ठोकतील आणि तुला बर्फावर झोपवतील’, अशा धमक्या देऊन मानसिकदृष्ट्या खच्ची केले. घाबरलेल्या व्यक्तीने समोरच्याने सांगितल्यानुसार सेंट्रल बँक ऑफ इंडियातील अरमान मन्सुरीच्या खात्यात तीन लाख रुपये वळते केले. परिस्थितीची शंका आल्यावर तक्रारदाराने उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कोणत्याही संदेशांना बळी पडू नका!
यापूर्वीही ‘तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ आढळले आहेत’, ‘तुमच्या खात्यात काळा पैसा जमा झाला आहे’ अशा खोट्या कारणांवरून नागरिकांना धमकावून फसवणुकीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. डिजिटल गुन्हेगार नागरिकांच्या भीतीचा गैरफायदा घेत लाखोंची उकळी करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. नागरिकांनी अशा प्रकारच्या कॉल्स किंवा व्हॉट्सॲप संदेशांना बळी न पडता तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT