मुंबई

अंबुजा सिमेंट्सच्या प्रकल्पावर ‘जनता दरबार’

CD

उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील आंबिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या अंबुजा सिमेंट्सच्या प्रस्तावित सहा एमएमटीपीए क्षमतेच्या सिमेंट ग्राईंडिंग युनिटवर जनमत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जनता दरबार भरवण्यात आला आहे. ही सुनावणी मंगळवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या परिसरात होणार आहे.
स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त, सामाजिक संस्था, तसेच पर्यावरणप्रेमी संघटनांना आपले आक्षेप, सूचना आणि मत नोंदविण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी तोंडी किंवा लेखी स्वरूपात आपले मत व्यक्त करता येईल. लेखी आक्षेप थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण-१ उपप्रादेशिक कार्यालयात सादर करता येतील किंवा srokalyanl@mpcb.gov.in या ई-मेलवरही पाठवता येतील. अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने मोहने, अटाळी आणि आंबिवली गावांच्या परिसरात हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रकल्पाचा स्थानिक पर्यावरण, हवा, पाणी आणि सामाजिक आराखड्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यासाठी भारत सरकार पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या अधिसूचना (१४ सप्टेंबर २००६ व सुधारित १ डिसेंबर २००९) नुसार ही सुनावणी अनिवार्य केली आहे.
सुनावणीमुळे प्रकल्पाची पारदर्शकता राखली जाईल आणि नागरिकांना थेट आपली चिंता, अपेक्षा व आक्षेप नोंदविण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेतून स्थानिक प्रतिसाद, पर्यावरणीय परिणाम आणि जनतेची भूमिका यांचा सर्वंकष आढावा घेता येणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

मराठी व इंग्रजी भाषेत मूल्यमापन अहवाल
प्रकल्पासंबंधीचा कार्यकारी सारांश व पर्यावरण परिणाम मूल्यमापन अहवाल मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध करून दिले आहेत. हे अहवाल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा परिषद, कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालय, उल्हासनगर महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगर परिषद, बदलापूर नगर परिषद, भिवंडी महापालिका, पर्यावरण विभाग मंत्रालय (मुंबई), तसेच नागपूर येथील विभाग कार्यालयात पाहता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT