मुंबई

सडका कांदा घाणीतून नागरिकांच्या ताटात? कांदा-बटाटा मार्केटमध्ये भयानक कृत्य

CD

सडक्या कांद्याची पुन्हा विक्री
मार्केटमध्ये फेकलेल्या मालाची रिक्षांमधून वाहतूक
जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : धकाधकीच्या जीवनात अनेकदा घराबाहेर रोजची न्याहारी अनेकांना घ्यावी लागते; मात्र तुम्ही खात असलेल्या वस्तू कशा बनवल्या जातात, याबाबत मात्र अनेकदा अनभिज्ञच असतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत फेकून दिलेला कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई बाजार समितीमधील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र घाण पसरलेली आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये सडलेल्या मालाचे ढीग, फळ मार्केटमधील घाणीचे साम्राज्य आणि शौचालयाशेजारी टाकलेला माल अशी स्थिती सध्या बाजारात आहे. अशातच कांदा-बटाटा मार्केटमध्ये फेकलेल्या सडक्या कांद्याची रिक्षातून वाहतूक होत असल्याची बाब समोर आली आहे.
-----------------------------------
दुर्गंधीशी सामना
आशिया खंडातील मोठी बाजारपेठ म्हणून मिरवणाऱ्या बाजार समितीमध्ये घाणीचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाण्याची डबकी तयार झाली आहेत. परिणामी, डासांची पैदास होऊन डेंगी, मलेरियासारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. तसेच फळ, भाजीपाला आणि कांदा-बटाटा शेतमाल नाशवंत असल्याने काही ठिकाणांवर नेहमीच दुर्गंधीशी सामना करावा लागतो.
---------------------------------------------
अधिकारी अनभिज्ञ
बाजार समितीचे प्रशासक विकास रसाळ यांनी एपीएमसी प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचाऱ्यांची गुरुवारी (ता. ४) बैठक घेतली. या बैठकीत बाजार समितीचे उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांची शेतमालाला योग्य दर मिळवून देणे, शिस्तबद्ध काम करणे, अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. शिवाय, पाचही मार्केटमधील बांधलेल्या मालमत्तांची पाहणी त्यांनी केली; मात्र फेकलेल्या मालाची वाहतूक होत असलेल्या प्रकाराबाबतची माहिती दिली गेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rashid Khan : रशीद खानबरोबरची 'ती' महिला कोण? फोटो व्हायरल होताच स्वतः केला खुलासा

Latest Marathi Breaking News : बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा - गणेश नाईक

Pune ZP Students : जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा नासा दौरा; वॉशिंग्टन, ऑरलॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्कोची सफर

जिकडे तिकडे फक्त तीच! का रंगलीये ट्विटरवर गिरीजा ओकची चर्चा? तिने असं केलंय तरी काय? नेमकं काय घडलंय?

Navi Mumbai: रस्ते अपघातग्रस्तांना मिळणार भरपाई, नवी मुंबई महापालिकेची योजना

SCROLL FOR NEXT