मुंबई

बंगल्यातील घुसखोरी चोराला भारी

CD

बंगल्यातील घुसखोरी चोराला भारी
पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने पायांना दुखापत
रोहा, ता. ४ (बातमीदार)ः हातात धारदार शस्त्र घेऊन आलिशान बंगल्यात घुसलेल्या चोराने थेट पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत चोराच्या दोन्ही पायांना दुखापत झाली असून, घरमालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
रोहा रेल्वेस्थानकाच्या पलीकडे नव्याने तयार होत असलेल्या मेघासिटी फेज-२ या परिसरात पिंगळसई येथील सुनील मुटके यांचा दोन एकर जागेत फार्महाउससहित आलिशान बंगला आहे. या बंगल्यात सोमवारी (ता. १) दुपारी १:४५ च्या सुमारास गंदूर झगरू ओरण लकडा ( रा. केडली, जि. गुमला-झारखंड) याने कुदळ, फावड्याने बंगल्याच्या मुख्य दरवाज्याची काच फोडून आत प्रवेश केला. फार्महाउसची देखरेखीसाठी असलेल्या संगीता वाळेकर, त्यांची मुलगी अनु वाघमारे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी बंगल्याबाहेर पळ काढताना दरवाजाला बाहेरून कढी लावली होती. त्यामुळे घरात अडकलेल्या चोराने घरातील किमती वस्तूंची तोडफोड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवारांच्या बनावट पत्रावर सुचविली एक कोटीची कामे; जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर बनावट स्वाक्षरी!

Women's World Cup Semifinal: लक्ष्य एक; पण अडचणी अनेक, महिला विश्वकरंडक, भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

'शिर्डी के साईबाबा'फेम सुधीर दळवींना गंभीर आजार, कुटुंब उपचारासाठी कुटुंबाकडून आर्थिक मदतीचं आवाहन

Solapur News: सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘त्या’ बाळांची आज ‘डीएनए’ टेस्ट; नर्सकडून बाळाची अदलाबदल झाल्याचे प्रकरण..

Panchang 30 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT