मुंबई

पनवेलमध्ये दोन गाव एक गणपती

CD

पनवेलमध्ये दोन गाव, एक गणपती
धाकटा खांदा गावातील दीडशे वर्षे जुनी परंपरा
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः धाकटा खांदा व मोठा खांदा या जुळ्या गावांना एकत्र आणणारी, भक्तीचा आणि परंपरेचा वारसा जपणारी एक अद्वितीय परंपरा आजही जिवंत आहे. या गावांतील दीडशे वर्षे जुने स्वयंभू गणेश मंदिर आजही ‘दोन गाव, एक गणपती’ या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे.
राज्यातील ही परंपरा इतरत्र कुठेही आढळून येत नसल्याने या मंदिराचे वैशिष्ट्य अधिक अधोरेखित होते. गावकऱ्यांचा असा अनुभव आहे की, गणेशोत्सव काळात घराघरात गणेशमूर्तीची स्थापना केल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच ग्रामस्थांनी एकत्र येऊन फक्त या स्वयंभू मंदिरातच गणेशपूजन करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, दोन्ही गावातील ग्रामस्थ उत्सव काळात घराघरात गणेश स्थापना न करता गौरी पूजनाची परंपरा जिवंत ठेवतात. गणेशोत्सव काळात श्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून मंदिरात भजन, कीर्तन, भारूड तसेच पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम होत असतात. ग्रामस्थांसाठी भोजनव्यवस्थादेखील केली जाते. यातून भक्तिभाव आणि ग्रामएकता अधोरेखित होत असल्याचे जाणवते.
.................
गणेशोत्सवाचा समारोप मिरवणुकीने
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांतील ग्रामस्थ एकत्र येऊन वाजत-गाजत मिरवणूक काढतात. ढोल-ताशांच्या निनादात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात काढली जाणारी ही मिरवणूक ग्रामएकतेचे दर्शन घडवते.
.............
चौकट
मंदिरातील देवतांचा संगम
अख्यायिकेनुसार इंग्रज आमदानीच्या काळात प्लेगच्या भीतीने ग्रामस्थांनी जंगल परिसरात नवीन वस्ती वसवताना येथे सफाईदरम्यान डाव्या सोंडेचा स्वयंभू गणेश, भवानी माता, वेताळेश्वर महाराज, वाघेश्वर महाराज, नंदी यांसह अनेक पुरातन मूर्ती सापडल्या. ग्रामस्थांनी श्रद्धेने त्या ठिकाणी मंदिर उभारले. १९९२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला.
.................
धार्मिक एकतेचे प्रतीक
धाकटा खांदा व मोठा खांदा या गावांतील गणेशोत्सव आजही केवळ देवपूजेसाठी नव्हे तर एकात्मता, भक्तिभाव आणि परंपरा जपण्यासाठी स्मरणात राहतो. दोन गाव, एक गणपती, ही परंपरा आजच्या पिढीसाठी ग्रामसंस्कृतीचे आणि एकतेचे जिवंत उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT