राष्ट्रीय क्रमवारीत ‘आयआयटी’ तिसरी
खासगी विद्यापीठे, संस्थांचा वरचष्मा
मुंबई, ता. ४ ः केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) यंदा आयआयटी मद्रासने सलग सातव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले. बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सलग १०व्या वर्षी द्वितीयस्थानी राहिले असून, सर्वच संस्थांमध्ये खासगी विद्यापीठे आणि संस्थांचा या क्रमवारीत सर्वाधिक वरचष्मा राहिला आहे. देशातील विद्यापीठे, शिक्षण संस्थांपैकी पहिल्या १०० संस्थांच्या क्रमवारीत राज्यातील १० संस्थांचाही समावेश असून देशपातळीवर आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अनुदानित विद्यापीठांपेक्षा खासगी विद्यापीठ संस्थांनी या क्रमवारीत वरचे स्थान गाठले आहे. मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट २० स्थानावर तर पुण्यातील सिंबॉसिस इंटरनॅशनल ४०, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इज्युकेशन अँड रिचर्स पुणे-५५, मुंबईतील आयसीटी-६४, डीवाय पाटील विद्यापीठ-७१, दत्ता मेघे इंन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च-८४, पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-९१, मुंबई विद्यापीठ-९२ आणि मुंबईतील एसव्हीकेएमए मॅनेजमेंट संस्था क्रमवारीत ९५ व्या स्थानावर आहे.
देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाने थोडीशी प्रगती केली असून मागील वर्षी ६१व्या स्थानावरून ५४व्या स्थानावर पोहोचले आहे. दुसरीकडे आयसीटीनंतर सर्व खासगी विद्यापीठे आणि संस्थांनी अशा राज्यातील एकूण सात संस्थांनी आपले नाव कोरले आहे. देशभरातील महाविद्यालयांच्या क्रमवारीत पहिल्या ५०मध्ये राज्यातील एकाही महाविद्यालयाचा समावेश नाही. मात्र, त्यापुढील क्रमवारीत मुंबईतील सेंट झेव्हियर्ससह पुण्यातील फर्ग्युसन आणि अमरावती येथील श्री शिवाजी सायन्स कॉलेजचा समावेश झाला आहे. राज्य विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले राज्य विद्यापीठ, मुंबई आणि पुण्यातील सीओईपींचा समावेश आहे. अभियांत्रिकीमध्ये आयआयटी मुंबई, आयसीटी, सीओईपी, व्हीएनआयटी, सिंबॉसिस आदी संस्थांचा समावेश आहे. फार्मासी शिक्षणासाठी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचाही समावेश झाला आहे.
...
आयआयएम सातव्या स्थानी
व्यवस्थापन संस्थांमध्ये मुंबईतील आयआयएम सातव्या स्थानी आहे. त्यानंतर वैद्यकीय संस्थांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि दत्ता मेघे शिक्षण संस्थाचा समावेश आहे. आर्किटेक्चरच्या संस्थांमध्ये केवळ नागपूर येथील व्हीएनआयटीने आपले नाव कोरले आहे. फार्मसीच्या शिक्षण संस्थांमध्ये सर्वाधिक अशा दहा संस्थांचा पहिल्या १०० संस्थांमध्ये समावेश झाल्याचेही या क्रमवारीतून दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.