भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेची प्रभागरचना कोणताही बदल न करता जाहीर केल्याने समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रभागरचना करताना नैसर्गिक परिणामे गृहीत न धरता रस्त्यापलीकडील मतदारांचाही समावेश वार्ड व प्रभागात केला आहे. मागील पालिका निवडणुकीत बहुमत घेणारा शहरात काँग्रेस हा एकच पक्ष असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिल्याचा दावा काँग्रेस प्रभाग अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील फुटीनंतर प्रथमच या निवडणुकीला सामोरे जात आहे. तर सत्ताधारी भाजप-सेना-राष्ट्रवादी यांचा सामूहिक प्रभावही पालिका निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे.
भिवंडी महापालिका ही ‘ड’ वर्गाची महापालिका आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीसाठी यापूर्वी त्रिसदस्य प्रभाग करणार होते. परंतु आता मागील निवडणुकीनुसार चार सदस्यांचा एक प्रभाग आणि ९० वार्ड कायम ठेऊन २३ प्रभाग करण्यात आले आहेत. त्रिसदस्य प्रभागरचनेमुळे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात एकूण १०१ वार्ड होणार असल्याने राजकीय आणि स्वतंत्र उमेदवार चिंतेत होते. नवीन वार्ड रचनाचा अंदाज न आल्याने वार्ड व प्रभाग बांधणीला मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे शहरात आजही शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरात नगरसेवकांची कार्यकारिणी बरखास्त होऊनही ते माजी नगरसेवक म्हणवून घेण्यास तयार नाही. मात्र, वार्डातील व शहरातील समस्येकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, काही नगरसेवकांनी पक्षीय बांधिलकी सोडून प्रभागाचे स्वतंत्र पॅनल तयार करून गणेशोत्सवात फलकही लावले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार स्थानिक व जवळच्या उमेदवाराला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे अनेक वेळा राजकीय पक्षही नशीब आजमावत आहेत. उमेदवार त्यांच्या चिन्हावर उभे राहतात. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीपुरते काही उमेदवार पक्षाला डावलून विविध आघाडी करून निवडणूक लढवतात. अशा वेळी अपक्षांची सत्ता येते. अशा घटना महापालिकेच्या इतिहासात वारंवार घडलेल्या आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.
काही उमेदवार वार्ड रचना व प्रभाग रचनेबाबत माहिती न घेता थेट निवडणुकीत उतरून मतदारांची दिशाभूल करतात. मात्र, निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहेत. त्यापैकी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा वरिष्ठांकडून आघाडीबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत सर्व प्रभागांत उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.
भिवंडीत केवळ काँग्रेस पक्ष असून शहरातील लोकांच्या समस्येसाठी सत्ताधारी आणि महापालिकेविरोधात संघर्ष करीत आहे. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने काँग्रेसच्या मतांचा प्रभाव कायम राहतो आणि सदस्यांची संख्या वाढते. मागील निवडणुकीत लोकांनी निवडून दिल्याने संख्याबळ जास्त होते. हा प्रभाव पुन्हा लोकसभा निवडणुकीत दिसून आला.
- ॲड. रशीद ताहीर, माजी आमदार
अध्यक्ष, काँग्रेस भिवंडी शहर जिल्हा
पालिकेच्या निवडणूक विभागाचे काही वर्षांपासून नवीन वार्ड रचनेचे काम सुरू होते. ते आता जाहीर केलेल्या प्रभागरचनेवरून दिसून येत नाही. प्रभागरचना करताना नैसर्गिक सीमा, रस्ते आणि वस्त्यांचा योग्य वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. असे असताना रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडील मतदारांची मोट एकाच वार्डात बांधली आहे. याबाबत आम्ही हरकती नोंदविणार आहोत.
- रियाझ आझमी, शहराध्यक्ष,
समाजवादी पक्ष
भिवंडी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरकारच्या निर्देशानुसार चार सदस्य प्रभाग बनविल्याने मागील वार्ड व प्रभाग रचना कायम ठेवल्या आहेत. सीमा भागातील काही नव्याने बदल झाल्याने खुणा व स्थळांची नावे बदलली आहेत. त्यानुसार ९० प्रभाग आणि २३ प्रभाग आहेत. त्यासाठी २०११ ची जनगणना गृहीत धरली आहे.
- नितीन पाटील, निवडणूक अधिकारी,
भिवंडी निजामुद्दीन शहर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.