मुंबई

थाोडक्‍यात रायगड बातम्या

CD

शिक्षिका सुजाता मालोरे यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार
माणगाव (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये माणगाव तालुक्यातील भादाव येथील शिक्षिका सुजाता संतोष मालोरे यांची निवड झाली आहे. दरवर्षी ५ सप्टेंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा गौरव आदर्श शिक्षक पुरस्काराद्वारे केला जातो. या वर्षी जिल्ह्यातील १७ शिक्षकांचा सन्मान होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली. मालोरे यांनी शाळा विकास, विद्यार्थी गुणवत्ता वाढ आणि समाज सहभाग या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे, पालकांशी सुसंवाद वाढविणे, यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भादाव येथील जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते.
.....................
भाल विठ्ठलवाडीमध्ये पारंपरिक गौराईचा नाच
पेण (बातमीदार) : आधुनिक युगात अनेक जुन्या परंपरा हरवत असताना, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील काही गावे आजही आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करीत आहेत. खारेपाटातील भाल विठ्ठलवाडी, जनवली बे, डिमोठे भाल, तुकारामवाडी, खार सापोली, वाशी, वढाव आणि फणस डोंगरी या गावांमध्ये गौराई नाचविण्याची अनोखी प्रथा आजही जोपासली जाते. ही प्रथा चार वेळा साजरी केली जाते. चैत्रागौर (चैत्र महिन्यात), मंगळागौर (श्रावणात), हरतालिका (भाद्रपदात) आणि गणेश आगमनानंतर ज्येष्ठागौर. विशेष म्हणजे, या प्रथेमध्ये गावातील महिला चिखलातून आणि पावसातून चालत दोन्ही हात सोडून डोक्यावरून गौराई नाचवत नेतात. यामध्ये सरोज अशोक म्हात्रे (भाल विठ्ठलवाडी) आणि निशा कृष्ण म्हात्रे (बोर्जे) यांचा सहभाग लक्षणीय होता. ही परंपरा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून गावातील स्त्रियांमधील एकात्मता, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. गौराई नाचविण्याच्या या प्रथेमुळे गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत जपली जाईल.
..............
रोह्यातील भजन स्पर्धेत नागोठणे येथील साईराम भजनी मंडळ अव्वल
रोहा (बातमीदार) : सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील नामांकित भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता. प्रत्येक मंडळाने आपल्या खास शैलीतून भक्तिरसाची उधळण केली. या स्पर्धेत नागोठणे येथील साईराम भजनी मंडळाने पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकाचा मान गौळवाडी येथील श्री राधाकृष्ण प्रासादिक भजनी मंडळाला मिळाला, तर तिसऱ्या क्रमांकावर वरवडे येथील श्री काळभैरव भजन मंडळ राहिले. विशेष पारितोषिकांमध्ये मरीआई महिला भजनी मंडळ (वांगणी) यांचा समावेश होता. याशिवाय उत्कृष्ट गायक म्हणून रोहित भोईर, उत्कृष्ट हार्मोनियमवादक मधुरा जोशी, तर उत्कृष्ट वादक मनोज पाटील यांना गौरविण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर, महेंद्र गुजर, माजी नगरसेवक अजित मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विजेत्या मंडळांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
.............
वरदाई ट्रस्टतर्फे महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण
रोहा (बातमीदार) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरदाई ट्रस्टच्या वतीने महिलांनी एकत्र येऊन सभागृहात अथर्वशीर्ष पठण केले. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, सुंदर पठण आणि त्यातून प्रकट झालेली श्रद्धा यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. स्त्रियांच्या सामूहिक स्वरात झालेले अथर्वशीर्ष पठण हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल वरदाई ट्रस्टकडून आभार मानण्यात आले. त्यांच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाची आध्यात्मिक छटा अधिक खुलून दिसली आहे.
............
सिद्दी जफर शेखानी मेमोरियल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा निकाल शंभर टक्के
मुरूड (बातमीदार) : अंजुमन इस्लाम जंजिरा संस्थेच्या सिद्दी जफर शेखानी मेमोरियल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा २०२४-२५ शैक्षणिक वर्षाचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. या संस्थेत चालणाऱ्या चार ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मेकॅनिकल मोटर गाडी ट्रेडमध्ये शहबाज शब्बीर मलबारी याने ९५.५० टक्के, इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये सन्नी संदेश पाटील याने ९२. ५० टक्के, डिझेल मेकॅनिकमध्ये कलीम इम्तियाज आदम याने ९४.३३ टक्के, तर वेल्डर ट्रेडमध्ये आय्यान असिफ खोत याने ८४.३३ टक्के गुण मिळवले. या वर्षी एकूण १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचे प्राचार्य इश्तियाक अ. हमीद घलटे आणि टेक्निकल कमिटीचे चेअरमन समीर दौंनाक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
...........
अनुजा गोगरने राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत पटकावले रौप्यपदक
मुरूड (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत मुरूड तालुक्यातील अनुजा रेखा देवानंद गोगर हिने भालाफेक प्रकारात दुसरा क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. अनुजा सध्या जिंदाल माध्यमिक विद्यालय, साळाव येथे शिकत आहे. या स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अनुजाच्या या यशाबद्दल आमदार महेंद्र दळवी, तालुक्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र खताळ, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक मुकेश ठाकूर आणि उपमुख्याध्यापक मंगेश बामनोटे यांनी अभिनंदन केले. गावकरी आणि शाळेतील शिक्षकांनी अनुजाच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
...............
प्रा. डॉ. मधुकर साळुंखे यांचा शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव
पेण (बातमीदार) : पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मधुकर हेमराज साळुंखे यांना साहित्यसंपदा संस्थेतर्फे शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ सप्टेंबर शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. साळुंखे यांनी मागील ३२ वर्षांत शिक्षणक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्यासह वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती जनजागृती, मतदार जागरूकता आणि एड्सविरोधी मोहिमा यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: 'हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त जातीचा अन् संख्येचा उल्लेख, मग आरक्षण कसं मिळणार?' जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Nepal Social Media Ban : सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमधील तरुण आक्रमक; संसदेत घुसण्याचा प्रयत्न, दोघे जखमी...काठमांडूमध्ये कर्फ्यू

विद्या बालनसाठी सुचित्रा बांदेकरांना दाखवला गेला बाहेरचा रस्ता; म्हणाल्या, 'मी तिला फोन केला तर...

Mumbai News: एकदम Cool प्रवास! मुंबई लोकलचं रुपडं पलटणार, वंदे मेट्रो स्टाइल डब्बे धावणार; पाहा गाडीचे वैशिष्ट्ये

Kolhapur politics : 'सतेज पाटील आणि राजू शेट्टी कर्जमाफीवरून ओरडत आहेत'; मुश्रीफांकडे सतेज पाटलांनी पाहताच शब्द फिरवला, जिल्हा बँकेच्या सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT