मुंबई

सोनिवली स्मशानभूमीची दयनीय अवस्था

CD

सोनिवली स्मशानभूमीची दयनीय अवस्था
छत नसल्याने पावसात अंतिम संस्काराची वेळ

बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : सोनिवली गावातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाइकांना अंतिम संस्कारासाठीदेखील संघर्ष करायला लागत आहे. स्मशानभूमीवर छप्पर नाही, तसेच जागोजागी चिखल साचला आहे. खराब रस्ता आणि पावसामुळे सरणावरील लाकडे जळत नसल्याने या सगळ्याचा त्रास नातेवाइकांना अंत्यविधीदरम्यान सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी (ता. ५) अंत्यविधीच्या वेळी लाकडे ओलसर असल्याने पेटत नसल्याने ग्रामस्थांनी ३० लिटर डिझेल स्वतः विकत घेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

२००५ मध्ये आलेल्या पुरात ही स्मशानभूमी वाहून गेली होती. त्यानंतर केवळ तात्पुरते पत्र्याचे छप्पर टाकले गेले होते. तेही छप्पर कोरोना काळात कोसळले आणि तेव्हापासून आजतागायत कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आलेले नाही. कोरोनाकाळात मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी २७ लाखांचा निधी मंजूर केल्याचा बॅनर झळकवण्यात आला होता; पण प्रत्यक्षात एकही काम झालेले नाही, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता निधी गेला कुठे, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

कोरोनाकाळापासून आम्ही स्मशानभूमीच्या दुरुस्तीची वाट पाहत आहोत. तत्कालीन मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी त्या वेळी २७ लाख रुपये निधी मंजूर केला; मात्र या ठिकाणी कोणतेच काम करण्यात आले नाही. मग हे २७ लाख रुपये गेले कुठे? रस्त्यावरील खड्डे, पाणी, विजेची समस्या याला तोंड देत बदलापुरात जगणे तर कठीण झालेच आहे; मात्र मरण त्याहून कठीण झाले आहे.
- जितेश शरद माळी, ग्रामस्थ

या स्मशानभूमीकडे येणारा रस्ता उखडून गेला आहे आणि स्मशानभूमीची वाट संपूर्ण निसरडी झाली आहे. सामान्य करदात्यांना पालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असतानाही, या स्मशानभूमीची ही अवस्था पाहिल्यानंतर नक्की पालिका प्रशासन करतेय काय, असा सवाल निर्माण होत आहे. पालिका प्रशासन जर याच स्मशानभूमीकडे लक्ष देत नसेल तर आमदार किसन कथोरे त्यांच्याकडे आम्ही समस्या घेऊन जाणार आहोत.
- जयेश केवणे, मृताचे नातेवाईक

स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाबाबत निविदा मंजूर करण्यात आली असून, कामाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. लवकरच या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येऊन, सगळ्या सुविधा देऊन ही स्मशानभूमी चांगल्या स्थितीत बांधणार आहोत.
- विजय पाटील, नगर अभियंता, कुळगाव-बदलापूर नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: 'हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त जातीचा अन् संख्येचा उल्लेख, मग आरक्षण कसं मिळणार?' जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Nepal Social Media Ban : सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमधील तरुण आक्रमक; संसदेत घुसण्याचा प्रयत्न, दोघे जखमी...काठमांडूमध्ये कर्फ्यू

विद्या बालनसाठी सुचित्रा बांदेकरांना दाखवला गेला बाहेरचा रस्ता; म्हणाल्या, 'मी तिला फोन केला तर...

Mumbai News: एकदम Cool प्रवास! मुंबई लोकलचं रुपडं पलटणार, वंदे मेट्रो स्टाइल डब्बे धावणार; पाहा गाडीचे वैशिष्ट्ये

Kolhapur politics : 'सतेज पाटील आणि राजू शेट्टी कर्जमाफीवरून ओरडत आहेत'; मुश्रीफांकडे सतेज पाटलांनी पाहताच शब्द फिरवला, जिल्हा बँकेच्या सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT