मुंबई

तस्‍करांवर वन विभागाची करडी नजर

CD

तस्‍करांवर वन विभागाची करडी नजर
कर्जत तालुक्यात वनसंपत्ती तस्करी रोखण्यासाठी गस्त मोहीम
कर्जत, ता. ७ (बातमीदार) : तालुक्यातील मौल्यवान वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाने अवैध तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून लाकूड चोरी आणि त्याची अवैध वाहतूक रोखण्यासाठी रात्रंदिवस गस्त घालून तपासणी सुरू आहे. या मोहिमेमुळे तस्करांचे मनोबल खच्ची होऊन वनसंपत्ती सुरक्षित राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वन विभाग आहे. यामध्ये विविध प्रकारची मौल्यवान वनसंपत्ती आहे, मात्र मागील काही दिवसांपासून या वनसंपत्तीवर तस्‍करांची नजर पडली आहे. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या अंधारात वन संपत्तीची तस्‍करी केली जात आहे. मागील काही वर्षांत याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. त्‍यामुळे वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी वन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. २६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत कर्जत (पश्चिम) वन विभागात सतत गस्त मोहीम राबवण्यात आली. यामध्ये केवळ रस्त्यावरील तपासणीच नव्हे तर रात्रीच्या वेळी जंगल परिसरात गस्त वाढवण्यात आली. उपवनसंरक्षक (अलिबाग) राहुल पाटील आणि सहाय्यक वन संरक्षक (पनवेल) सागर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली.
................
संशयास्पद वाहनांची तपासणी
मोहिमेदरम्यान कर्जत आणि खालापूर तालुक्यातील नढाळ, चौक, बोरगाव, वावरले, ओलमन, सुगवे, अस्सल, पळसदरी, पोशीर, कळंब, साळोख, वारे, डिकसळ आदी भागात वन कर्मचाऱ्यांकडून गस्त घालून संशयित वाहनांची तपासणी होत आहे, मात्र या काळात कोणतीही अवैध लाकूड वाहतूक आढळून आली नाही. तरीही ही सततची गस्त तस्करांसाठी मोठा अडथळा ठरत आहे.
...............
वन कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी खेडेकर यांच्यासह वनपाल निरगुडा (बोरगाव), जितेंद्र चव्हाण (कर्जत), विक्रम बडदे (वावरले), उदय मोरे (सुगवे), विठोबा सरगर (चौक), तसेच वनरक्षक शिलवंत (वारे) आणि प्रकाश कुंभार (ओलमन) यांसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
................
वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी पुढील पावले
वन विभागाच्या या सातत्यपूर्ण सतर्कतेमुळे तालुक्यातील अवैध लाकूड तस्करीवर अंकुश बसण्यास मदत होईल, असा विश्वास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वन क्षेत्रातील मौल्यवान झाडांची कत्तल रोखण्यासाठी पुढील काळातदेखील अशा मोहिमा नियमित राबवण्याचा मानस असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: 'हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त जातीचा अन् संख्येचा उल्लेख, मग आरक्षण कसं मिळणार?' जरांगे पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Nepal Social Media Ban : सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमधील तरुण आक्रमक; संसदेत घुसण्याचा प्रयत्न, दोघे जखमी...काठमांडूमध्ये कर्फ्यू

विद्या बालनसाठी सुचित्रा बांदेकरांना दाखवला गेला बाहेरचा रस्ता; म्हणाल्या, 'मी तिला फोन केला तर...

Mumbai News: एकदम Cool प्रवास! मुंबई लोकलचं रुपडं पलटणार, वंदे मेट्रो स्टाइल डब्बे धावणार; पाहा गाडीचे वैशिष्ट्ये

Kolhapur politics : 'सतेज पाटील आणि राजू शेट्टी कर्जमाफीवरून ओरडत आहेत'; मुश्रीफांकडे सतेज पाटलांनी पाहताच शब्द फिरवला, जिल्हा बँकेच्या सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT