ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : माजिवडा ते वर्सोवा चौक (फाउंटन) पर्यंतचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हाती घेतलेले रस्ता रुंदीकरणाचे नियोजनही पूर्णपणे फसले आहे. स्मार्ट ठाणे संकल्पनेला अधिकारी व लोकप्रतिनिधींनी खड्ड्यात घातल्याचा संताप नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. ठाण्यात असा एकही रस्ता नाही, ज्यावर खड्डे नाहीत, असा संताप रिपब्लिकन बहुजन सेनेने व्यक्त केला आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतातील पहिली टेसला कार घेऊन स्वतःच्या मतदारसंघात फेरफटका मारावा. यामुळे कार खड्ड्यातून कशी चालते हे अनुभवता येईल, असे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटी योजना ठाण्याच्या रस्त्यांवर सत्ताधाऱ्यांमुळे खड्ड्यात उतरली आहे. काही वर्षांपूर्वी माजिवडा ते फाउंटनला जाताना एकेरी रस्ता होता आणि काही मिनिटांत अंतर कापता येत असे. आता तो मार्ग चार पदरांचा होऊनही चार तास लागतात, हे प्रचंड संतापजनक आहे, असे घाटे यांनी सांगितले. घोडबंदर मार्गाचे रुंदीकरण करताना अनेक चुका झाल्या असून, परिसराचे नियोजन पद्धतशीरपणे करता आले असते. मात्र, माजिवडा ते वर्सोवा चौक (फाउंटन हॉटेल) येण्या-जाण्यास वाहनचालकांना चार तास लागतात. हा मार्ग पूर्ण खड्ड्यात गेला असून या खड्ड्यांची माहिती घ्यायची असेल तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या नातवासाठी घेतलेल्या भारतातील पहिल्या टेसला कारमध्ये कुटुंबाला बसवून घोडबंदर मार्गे आपल्या मतदारसंघात फेरफटका मारावा, त्यानंतर येथील लोक आणि कुटुंबीय काय म्हणतात ऐकावे, असे आवाहन घाटे यांनी केले आहे. ठाण्याच्या सत्तेत ३० वर्षे ठाण मांडून बसलेल्यांचे आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार विसर्जन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही घाटे यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.