मुंबई

टीएमटीचे गणेशोत्सवात ४० लाखांचे नुकसान

CD

गणेशोत्सवात टीएमटीचे ४० लाखांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणेकरांना उत्तम दर्जेदार पर्यावरणपूरक व गारेगार प्रवास देण्याचा प्रयत्न ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेकडून करण्यात येत आहे; मात्र गणेशोत्सवानिमित्त कोकणात व गावी गेलेल्या नागरिकांमुळे त्याचा परिणाम थेट टीएमटीच्या उत्पन्नावर झाल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात दिवसाकाठी चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत होते. मागील १० दिवसांत सुमारे ४० ते ४५ लाखांचा फटका ठाणे परिवहन सेवेला सहन करावा लागल्याचे दिसून आले आहे.

ठाणेकरांना उत्तम प्रवास व अधिक वेगवान प्रवास देण्यासाठी टीएमटीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात शहरातील महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गावर जास्तीत जास्त बस सोडून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी टीएमटीकडून नियोजन आखले जात आहे. अशातच सण उत्सवाच्या काळातदेखील ठाणेकर नागरिकांना व प्रवाशांना अधिकाधिक चांगली वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ठाणे परिवहन सेवेने प्रयत्न केले होते; मात्र गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक हे कोकणात व गावी गेल्याने त्याचा परिणाम टीएमटीच्या उत्पनावरही झाल्याचे दिसून आले.

इतर दिवशी ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न हे साधारण २८ ते २७ लाखांच्या घरात असते, मात्र गणेशोत्सवाच्या काळात हे उत्पन्न सरासरी २५ ते २४ लाखांच्या खाली गेल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. याचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत ठाणे परिवहन सेवेला सुमारे ४० ते ४५ लाखांचा फटका सहन करावा लागला. बुधवारी २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी २४ लाख ७८ हजार ५९४ रुपये, तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ सप्टेंबरला ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न हे २३ लाख ८९ हजार होते, तर ५ सप्टेंबरला ईद निमित्ताने सुट्टी असल्याने या दिवशी उत्पन्न २४ लाख ६७ हजार २८९ इतके होते. ७ सप्टेंबरला रविवार असल्याने परिवहनच्या तिजोरीत आणखीन घट होऊन २२ लाख ९३ हजार रुपये इतके उत्पन्न जमा झाले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत प्रवासीसंख्या कमी होती. परिणामी परिवहन सेवेच्या उत्पन्नात साधारण तीन ते चार लाखांची घट होत होती. त्यानुसार गणेशोत्सवाला १० दिवसांच्या कालावधीत प्रवासीसंख्या घटल्याने परिवहन सेवेला ४० ते ४५ लाख रुपये उत्पन्न कमी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


२७ ऑगस्ट (गणेश चतुर्थी) : २४,७८,५९४ रुपये उत्पन्न
५ सप्टेंबर (ईद निमित्त सुट्टी) : २४,६७,२८९ रुपये उत्पन्न
६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) : २३,८९,००० रुपये उत्पन्न
७ सप्टेंबर (रविवार) : २२,९३,००० रुपये उत्पन्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT