मुंबई

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर ४० मिटर लांबीचा गर्डर

CD

बुलेट ट्रेनसाठी ४० मीटर लांबीचा गर्डर
पालघर जिल्ह्यातील पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लॉन्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई/पालघर, ता. ८ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्राच्या हद्दीत महत्त्वाची कामगिरी पूर्ण करण्यात आली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) शनिवारी (ता. ६) पालघर जिल्ह्यातील सखारे गावाजवळ फुल स्पॅन लॉन्चिंग गॅण्ट्रीच्या सहाय्याने ४० मीटर लांबीचा पहिला फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या शनिवारी (ता. ६) लॉन्च केला. डहाणू तालुक्यात साखरे येथील बुलेट ट्रेन मार्गावर स्वदेशी यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने फुल स्पॅन बॉक्स गर्डर म्हणजे दोन खांबांवर बसवण्यात येणारा पूलसदृश काँक्रीटचा हा भाग बसवण्यात आला आहे.

बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा महाराष्ट्रातील टप्पा १५६ किलोमीटर लांबीचा आहे. यामधील १३५ किलोमीटर उंच मार्गिकेवर (एलिव्हेटेड कॉरिडॉर) २,५७५ फुल स्पॅन गर्डर बसवले जाणार आहेत. प्रत्येक गर्डर ४० मीटर लांब आणि ९७० मेट्रिक टन वजनाचा आहे. एकसंध पद्धतीने तयार होणाऱ्या या गर्डरसाठी तब्बल ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील लागते. या तंत्रज्ञानाचा वापर करून काम १० पट जलद गतीने करता येते. गुजरातमधील ३१९ किलोमीटर वायाडक्ट पूर्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही या पद्धतीने पूल आणि वायाडक्टचे काम सुरू झाले आहे. शिळफाटा ते गुजरात सीमेपर्यंत एकूण १३ कास्टिंग यार्ड उभारले जात असून, त्यापैकी पाच यार्ड सध्या कार्यरत आहेत. पुलावर गर्डर बसविण्यासाठी संपूर्ण स्वदेशी यंत्रणा वापरली गेली आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी वेळेत अधिक काम शक्य आहे. त्यामुळे गर्डरची संकल्पना बुलेट ट्रेन प्रकल्पात महत्त्वपूर्ण मानली जाते.

सात डोंगरी बोगद्यांचे खोदकाम सुरू
ठाणे, विरार आणि बोईसर अशी स्थानके बुलेट ट्रेनसाठी निश्चित असून, मार्गासह इतर कामे गतीने सुरू आहेत. विरार आणि बोईसर स्थानकांसाठी पहिला स्लॅब टाकण्यात आला आहे. अतिजलद बुलेट ट्रेन उंच पुलावरून जाणार आहे. या पुलासाठी भक्कम खांब उभारण्याची कामे सुरू आहेत. आतापर्यंत ४८ किलोमीटरच्या जवळपास ही कामे झालेली आहेत. पालघर जिल्ह्यातील सात डोंगरी बोगद्यांचे खोदकामही सुरू आहे. आतापर्यंत ६ किमी बोगद्यांच्या एकूण मार्गातील २.१ किमी खोदकाम पूर्ण झाले आहे.⁠ वैतरणा, उल्हास आणि जागणी नदीवरील पूल बांधकामही सुरू आहे.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकाचे ८३ टक्के खोदकाम पूर्ण
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकाचे ८३ टक्के खोदकाम पूर्ण झाले असून, १०० फूट खोलीवर बेस स्लॅबचे काम सुरू आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स-शिळफाटा यादरम्यान २१ किमी भूमिगत व समुद्राखालील बोगद्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. यामध्ये त्यात सात किलोमीटरचा ठाणे खाडीखालील बोगद्याचाही समावेश आहे. दुसरीकडे विक्रोळी आणि सावली शाफ्टवर बेस स्लॅब पूर्ण करण्यात आले असून, महापे यार्डात टनेल लाइनिंग सेगमेंटचे उत्पादन सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT