मुंबई

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हृदयातून शिकवावे

CD

वाणगाव, ता. ९ (बातमीदार) : आजचे विद्यार्थी हे भविष्यातील देशाचे नागरिक आहेत. विद्यार्थ्यांना घडविणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून हृदयातून शिक्षण द्यावे. आई-वडील जन्म देतात, परंतु विद्यार्थ्यांना हातात खडू, पेन्सिल धरून अभ्यासाचे धडे गिरवण्याचे महान कार्य शिक्षक करतात. विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करून त्यांना उज्ज्वल भविष्याकडे मार्गक्रमण करण्याचे कार्य शिक्षक करत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती सदैव आदरभाव असला पाहिजे. महाविद्यालय, शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत असते. विद्यार्थ्यांचे भविष्य हे शिक्षकांवर अवलंबून असते, त्यांच्याप्रति शिक्षण घेत असतानाच नाही तर शिक्षणानंतरही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आदराची ज्योत प्रज्वलित ठेवली पाहिजे. शिक्षक हा समईतील वातीप्रमाणे सतत तेवत असतो, असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात केले आहे.

फार्मसी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, डिझाइन महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट आणि लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान गुरुकुल शिक्षण संकुलात शिक्षकदिन साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, संगीत खुर्ची, सेल्फी पॉइंट स्तंभ डिझाइन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सेल्फी पॉइंट तयार केला होता. या वेळी शिक्षकांनी सेल्फी घेत आनंद लुटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT