मुंबई

उल्हासनगरात नशेखोरांकडून १२ चारचाकी वाहनांची तोडफोड

CD

नशेखोरांकडून १२ वाहनांची तोडफोड
उल्हासनगर, ता. ९ (बातमीदार) : गणेशोत्सव मंडळाने काढलेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाले होते. यातील एका गटातील नशेखोर तरुणांनी १२ चारचाकी वाहनांच्या काचांची तोडफोड केल्याची घटना विठ्ठलवाडीतील गीता कॉलनीच्या रोडवर घडली आहे.

उल्हासनगर कॅम्प चारमधील व्हिटिसी ग्राउंड शेजारील गीता कॉलनीत गणेशोत्सव मंडळाने सोमवारी सायंकाळी बेकायदा विसर्जन मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत दोन गटांत वाद झाला होता. हा वाद तात्पुरता सोडविण्यात आला होता; मात्र रात्री परिसरातील दुसऱ्या गटातील काही तरुणांनी नशा करून गीता कॉलनी येथील गल्लीत उभ्या केलेल्या १२ वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर ह्या तरुणांनी मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या मैद्याच्या ट्रकची तोडफोड करीत चालक सुरेश नायक याला मारहाण केली आहे. घटना उघडकीस आल्यावर वाहनांच्या काचा फोडलेल्या चालकांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रहार गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत तपास यंत्रणेला गती दिली असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT