मुंबई

अलिबागकरांचा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला घेराव

CD

अलिबागकरांचा राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला घेराव
दोन दिवसांत रस्ता सुसज्ज न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
पेण, ता. ९ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग ते वडखळ या २२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. त्‍यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. याकरिता अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीच्या वतीने पेण येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या वेळी उपस्थित असणारे ॲड. प्रवीण ठाकूर, ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह नीलेश पाटील, अमोल मुंडे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
अलिबाग-वडखळ रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असून, वडखळ, पेझारी, पोयनाड, तीनवीरा, खंडाळा यासह पुढे अलिबागपर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. या मार्गावरून प्रवास करताना अनेकांचे अपघात घडत आहेत. त्यातच प्रवाशांना या रस्त्यामुळे मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत असूनही याकडे संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या विभागाचे दुर्लक्ष जाणवत असल्याने अखेर अलिबाग तालुका रस्ते संघर्ष समितीच्या वतीने आज पेण येथील राष्ट्रीय महामार्ग विभाग या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. या वेळी उपस्थित राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अधिकारी विक्रम शिगवण व सहाय्यक अभियंता पंकज गोसावी यांना संघर्ष समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली; मात्र उद्या १० तारखेपासून वडखळ- अलिबाग राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT