मुंबई

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिक उत्तम खरीवले यांचे जंगी स्वागत

CD

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिक उत्तम खरीवले यांचे जंगी स्वागत
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील आदर्श गाव भातसाई गावचे सुपुत्र व गावातील पहिले सैनिक नायक उत्तम नथुराम खरीवले हे १७ वर्षांनंतर भारतीय सेनेतून निवृत्त झाले आहेत. निवृत्त झाल्यानंतर गावातील युवक, ग्रामस्थ व महिला मंडळकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. गावातील आई महादेवी मातेच्या मंदिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. विशेष म्‍हणजे त्‍यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतला होता.
वयाच्या १८ व्या वर्षी सैनिक उत्तम खरीवले यांची लष्करात भरती झाली. विशेष म्हणजे ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांना लहानपणापासूनच फौजी होण्याची प्रचंड इच्छा होती. प्रचंड इच्छाशक्ती आणि त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळे त्यांनी यशाला घुटणे टेकायला भाग पाडले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने सैनिक उत्तम खरीवले यांनी आपल्या छोट्याशा गावाचे नाव देश पातळीवर नेऊन ठेवले. आज जवळजवळ त्यांनी १७ वर्षे देशसेवेत अर्पण केली. त्यांच्या या योगदानाबद्दल सर्व गाववासीयांना सार्थ आभिमान आहे. गावातील सर्व तरुणांना त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे. अगदी कठीण प्रसंगी, कोणत्याही सुखसोयी आजूबाजूला उपलब्ध नसताना त्यांनी गावातून पहिले भारतीय सेनेत भरती होण्याचा मान मिळविला. गावातील प्रत्येक तरुण, युवावर्ग आज त्यांना आपले आदर्श मानतात. समस्त ग्रामस्थांसाठी एक ऐतिहासिक काल, जो पुढच्या कित्येक पिढ्यानपिढ्या कथन केला जाईल की भातसई गावामध्ये देशासाठी लढणारे तरुण जन्माला आले. त्यांची थोरवी वर्षानुवर्षे ऐकवली जाईल. असे जीवित्कार्य आज नायक उत्तम नथुराम खरीवले यांच्या हातून घडून आले आहे, असे मत अनेक ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT