मुंबई

माडी व्यवसायाला शासन स्थैर्याची गरज

CD

माडी व्यवसायाला शासन स्थैर्याची गरज
कोकण किनाऱ्यावरचा वारसा जपण्यासाठी भंडारी समाजाचा पुढाकार
मुरूड, ता. १० (बातमीदार) ः कोकण किनाऱ्यावर भंडारी समाजबांधवांचा परंपरेने चालत आलेला ताडी–माडी व्यवसाय आज संकटात सापडला आहे. नारळाच्या झाडांवरून मिळणाऱ्या या पेयाने अनेक पिढ्यांची उपजीविका चालवली. दरम्यान, शासकीय परवाना प्रक्रियेमधील जाचक अटी, कराचा वाढता बोजा, नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक अडचणींमुळे या व्यवसायाची घसरण वेगाने होत असल्याचे चित्र दिसत आहे. रायगड जिल्हा अधीक्षक आर. आर. कोल्हे यांनी २०२१मध्ये परवाना नूतनीकरण झाले असून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती दिली. दरवर्षी सहा टक्के शुल्कवाढ होते. विम्याच्या संरक्षणाची तरतूद नसली तरी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रेवदंडा, चौल, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर, म्हसळा, दिघी, हरिहरेश्वर, बोर्ली पंचतन इत्यादी भागांमध्ये अनेक दशकांपासून माडी काढण्याचा व्यवसाय सुरू आहे. माडावरून मिळणारी ही गोडसर माडी स्थानिकांच्या रोजीरोटीचे साधन आहे. गोव्यात माडी व काजूपासून फेणी तयार करून ती मोठ्या प्रमाणावर पर्यटकांपर्यंत पोहोचवली जाते. त्याच धर्तीवर कोकण किनाऱ्यालाही फेणी उत्पादनासाठी परवानगी मिळाल्यास रोजगारनिर्मिती होऊ शकेल, असे समाजबांधवांचे मत आहे. माडी केंद्र चालवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दरवर्षी बोली लावावी लागते. एका केंद्रासाठी साधारण ८० ते ८५ हजार रुपये शुल्क भरावे लागते. याशिवाय दरवर्षी १० टक्के वाढ होते. ही रक्कम व्यवसायाच्या तुलनेत खूपच अधिक असल्याची तक्रार आहे. दुसरीकडे प्रत्येक माडावरून दिवसाला दोन ते पाच लिटर माडी मिळते. एका झाडावरून वार्षिक दोन ते अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न होत नाही. अशा परिस्थितीत केंद्रधारकांचे खर्च भागणे कठीण झाले आहे.
.............
जोखमीचा व्यवसाय, विम्याचे संरक्षण नाही
माडी काढण्यासाठी रोज दोन वेळा ६० ते ७० फूट उंच माडावर चढावे लागते. ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता धाडसाने केलेल्या या कामात जीविताला मोठा धोका असतो. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील अनेक तरुण अपघातात जखमी झाले किंवा मृत्युमुखी पडले. मात्र अशा वेळी शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई अथवा विम्याचे संरक्षण मिळालेले नाही. अलीकडेच किशोर गजानन नाईक (रा. डोंगरी) यांची पडल्याने कंबर निकामी झाली, तर संतोष एकनाथ मयेकर (रा. भंडारवाडा) मधमाश्‍यांच्या हल्ल्यात पूर्ण अपंग झाले. त्यामुळे या व्यवसायाकडे तरुणाई आकर्षित न होणे स्वाभाविकच आहे.
.................
माडीचे आरोग्यदायी फायदे
ताजी माडी केवळ पेय नसून आयुर्वेदिकदृष्ट्याही उपयुक्त मानली जाते. कावीळ, मूतखडा यावर ती लाभदायक आहे. शरीरातील कडकी दूर करण्यासाठी तिचे सेवन फायदेशीर ठरते. अपायकारक नसलेल्या या पेयाला पर्यटकही उत्साहाने पसंती देतात. मुरूडसारख्या पर्यटनस्थळी समुद्रकिनारी असलेली माडी विक्री केंद्रे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरतात.
................
शासनाची भूमिका आणि अपेक्षा
शासन नियमांनुसार माडी २४ तासांपेक्षा जास्त साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आंबट झालेली माडी अक्षरशः ओतून द्यावी लागते. हीच माडी फेणी निर्मितीसाठी वापरण्याची परवानगी मिळाली तर हजारो लिटर माडीचा पुनर्वापर होईल आणि केंद्रधारकांना मोठा दिलासा मिळेल. यासाठी समाजबांधवांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन दिले असून, लवकरच आमदार महेंद्र दळवी यांचीही भेट घेणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT