मुंबई

चुकत नाही तोपर्यंत आम्‍ही झुकत नाही!

CD

चुकत नाही तोपर्यंत आम्‍ही झुकत नाही!
भरत गोगावले यांचा खासदार तटकरे यांना इशारा
रोहा, ता. १० (बातमीदार) ः चुकून चूक झाली तर समजू शकतो. जाणूनबुजून चूक केली तर मात्र आम्ही सहन करणार नाही. पूर्वीचा काळ संपलेला आहे. आजच्या कलियुगात येथेच करा आणि भरा, असे सांगत तुमच्या निवडणुकीत आमच्या तिघांकडून एक इंच चुकले असेल तर सांगा. आम्ही चार पावले मागे येऊ आणि नमस्कार करू. पण जोपर्यंत आमचे चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत नाही. आम्ही तुमच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. तुम्ही पण आमच्या निवडणुकीत इमानेइतबारे काम केले असते तर तुमच्यावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या होम ग्राउंडवर खरपूस समाचार घेतला.
धाटाव येथील आरआयआयसी हॉल येथे सोमवारी (ता. ८) शिवसेना पदाधिकारी मेळावा व पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, अल्पसंख्याक प्रमुख उस्मान रोहेकर, विपुल उभारे, विजय बोरकर, उद्देश वाडकर, मंगेश रावकर, संतोष चितळकर, मोतीराम गिजे, सायली सदावर्ते, नारायण खुळे आदी मान्यवर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी शाखाप्रमुख नीलेश वारंगे, राजेश डाकी, महेश खांडेकर, नारायण चितळकर, दीपक कदम, अक्षय वारंगे यांच्यासमवेत ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्यासमवेत सेनेच्या असंख्य नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता धाटाव विभागातील ठाकरे गटाला खिंडार पडले असून, शिवसेनेची (शिंदे गटाची) ताकद वाढली आहे.
...............
...तर तटकरे जन्माला आले नसते : आमदार महेंद्र दळवी
जिल्‍हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर धाटाव येथेच मी राजकारणाची वजाबाकी शिकलो. या भागाचे खंबीर नेतृत्व असणारे भाई पाशीलकर यांनीदेखील एकेकाळी तटकरेंच्या विरोधात दंड थोपटले होते. जिल्‍हा परिषदेमध्ये असताना मी भाई पाशीलकर यांना साथ दिली होती. कदाचित भाई उलट्या मार्गाने गेले असते तर तटकरे जन्मालादेखील आले नसते, हे त्रिवार सत्य आहे. त्यांच्या दादागिरीला घाबरण्याची गरज नाही. नामदार भरत गोगावले लोकांच्या मनातील पालकमंत्री आहेत आणि आज ना उद्या ते पालकमंत्री पदावर विराजमान होणारच, असा खणखणीत दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT