मुंबई

पितृपक्षामुळे नवीन वस्तू खरेदीला रोख

CD

पितृपक्षामुळे नवीन वस्तू खरेदीला रोख
बाजारपेठेतील उलाढाल मंदावली
वाशी, ता. ९ (बातमीदार) ः हिंदू संस्कृतीनुसार पितृपक्ष सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील सर्व व्यवहारांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरवडाभर चालणाऱ्या या काळात शुभकार्य टाळले जात असल्याने सदनिका, सोने तसेच नवीन कपडे खरेदी करण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, सरकारी कार्यालयांपासून बाजारपेठांपर्यंत सर्वत्र गर्दी कमी झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
पितृपक्ष हा आपल्या पितरांचे स्मरण करण्याचा कालावधी मानला जातो. पंधरवडाभर घराघरात श्राद्धकर्म, पिंडदान, खीरदान आणि ब्राह्मण भोजन यांसारखी धार्मिक कर्मे केली जातात. पितरांचा आशीर्वाद लाभावा, या श्रद्धेतून लोक या काळात कोणतेही शुभकार्य न करता धार्मिक कर्मकांडाला प्राधान्य देतात. भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही परंपरा मोठ्या प्रमाणावर पाळली जाते. अमावस्येला सर्वपक्षी श्राद्ध म्हणून विशेष तर्पण केले जाते. या धार्मिक परंपरेचा थेट परिणाम बाजारपेठेवर होत असून, व्यापाऱ्यांचे व्यवहार अडखळले आहेत. कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची वर्दळ थांबली आहे, तर वाहन खरेदीदेखील थांबली आहे. मोठे मॉल्स, किरकोळ बाजारपेठा, कपड्यांची दुकाने तसेच सराफ बाजारात नेहमीची गजबज दिसून येत नाही. पितृपक्ष संपेपर्यंत ही मंदी कायम राहील, मात्र पितृपक्षानंतर येणाऱ्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या खरेदीमुळे बाजारपेठा पुन्हा गजबजतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
..........
चौकट
सध्या पितृपक्ष सुरू असल्यामुळे नवीन कपडे खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. फक्त नियमित लागणारे कपडेच घेतले जात आहेत. त्यामुळे आर्थिक उलाढाल थांबली आहे.
अभिजित पार्टे, कपडेविक्रेते
..............
सोन्याच्या खरेदी-विक्रीतही मोठी घट झाली आहे. पितृपक्षामध्ये सोने खरेदीचा वेग मंदावतो. यावर्षीदेखील बाजारात मंदीच आहे.
मुलसिंह दुलावत, ज्वेलर्स विक्रेते
..........
रिअल इस्टेट क्षेत्रात जमीन व फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत, तर बांधकाम व्यावसायिकदेखील या पितपक्ष पंधरवड्यात व्यवहार होत नसल्यामुळे पिकनिकसाठी जातात, मात्र पितृपक्षांनतर नवरात्रीमध्ये मात्र पुन्हा व्यवहार सुरू होतात.
-प्रकाश बाविस्कर, बांधकाम व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

प्रवीण तरडेंचा ‘थिएटर व्हिजिट’ पॅटर्न आता बॉलिवूडमध्ये हिट! बॉलिवूडने स्वीकारला ‘तरडे फॉर्म्युला’

West Bengal Politics: पक्षात काहीतरी मोठं शिजतंय? ममतांच्या एका निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ, अचानक उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT