मुंबई

गांजा पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पकडणे शक्य

CD

गांजा पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पकडणे शक्य
वाहतूक विभागात सामील होणार सो टॉक्सा यंत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ९ ः दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. ठाणे वाहतूक विभागाने ड्रंक अँड ड्राईव्हच्या मोहिमेला आणखी गती देण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी २५ नवे ब्रेथ अनेलायझार यंत्रांचा आयुक्तालयात नव्याने पुरवठा केला आहे. विभागाकडे आधीचे ३२ यंत्र उपलब्ध असून वाहतूक विभागातील नाक्यांवर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. सोबतच गांजा आणि इतर अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवणाऱ्यांनाही पकडणे शक्य होणार आहे. यासाठी लवकरच वाहतूक विभागात सो टॉक्सा यंत्र दाखल होणार आहे.

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांचा शोध घेण्याबरोबरच गांजा, ड्रग्स यासारखे अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर देखील वाहतूक विभागाची नजर असणार आहे. अशा पदार्थाचे सेवन ब्रेथ अनेलायझर यंत्राच्या तपासणीत आढळून येत नाहीत. मात्र आता अशा व्यक्तीचा शोध घेण्यासाठी वाहतूक विभागाकडे चार सो टॉक्सा नामक आधुनिक यंत्र लवकरच उपलब्ध होणार आहेत. या यंत्राच्या माध्यमातून गांजासह इतर सहा अमली पदार्थांचे सेवन केल्याचे ऑन दी स्पॉट समजले जाऊन सेवन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. ठाणे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी या यंत्राच्या माध्यमातून प्रवासी चाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांची तपासणी होणार आहे.

दारू आणि इतर अमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे. असा गुन्हा करणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. आता या मोहिमेला आणखी गती दिली जाणार आहेत. वाहतूक विभागाकडे नव्याने २५ ब्रेथ एनालायझर उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच गांजा आणि इतर अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांची तपासणी करणारे यंत्र देखील उपलब्ध होणार आहे.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT