यंदा अभियांत्रिकेच्या प्रवेशाकडे कल
१० वर्षांतील विक्रम मोडीत; ४१० संस्थांमध्ये शिक्षण उपलब्ध
मुंबई, ता. १० : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल एक लाख १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निकच्या (अभियांत्रिकी पदविका) विविध शाखांच्या प्रवेशाकडे कल दाखवला आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत आयटीआयसह पदवी अभियांत्रिकी इत्यादी प्रवेशापेक्षा पदविकेच्या पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून आले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्यातील ४१० शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या एक लाख १० जागांपैकी तब्बल एक लाख सात हजार ५४५ जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. या प्रवेशामध्ये प्रामुख्याने सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमिकल अशा शाखांना विद्यार्थ्यांनी मोठी पसंती दर्शविली आहे.
------------------------------
१५ सप्टेंबरपर्यंत मुदत
अभियांत्रिकी प्रवेशाच्या चार फेऱ्यांपर्यंत एक लाख तीन हजार ४५९ प्रवेश झाले होते. आता पाचव्या फेरीनंतर तब्बल एक लाख सात हजार ५४५ हून अधिक जागांवर प्रवेश झाले असून, यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याने प्रवेशाची ही संख्या एक लाख २० हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
--
प्रवेशासाठी झालेले प्रयत्न
- दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर झाल्याने प्रवेश वाढले
- प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा योग्य वापर
- पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांना उत्तम पगाराची नोकरी
- दहावीनंतर कमी कालावधीतील उत्तम पर्याय
- राज्यातील तंत्रनिकेतनांची महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत देखरेख
- विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्याकरिता स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन (सेल्फ लर्निंग असेसमेंट)
- सततच्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अद्ययावत करण्यासाठी ‘इमर्जिंग ट्रेंड इन प्रोग्राम’चा अभ्यासक्रमात अंतर्भाव
- मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अध्यापनाचा पर्याय निवडक पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध
--
मागील काही वर्षांतील प्रवेश
पदविका अभ्यासक्रम २०२१-२२ २०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५ २०२५-२६
संस्थांची संख्या ३६७ ३६५ ३८८ ४०० ४१०
प्रवेश झालेले विद्यार्थी ६९,७०५ ८४,४५२ ८६,४६५ ९५,५११ १,०७,५४५
एकूण टक्केवारी ७० टक्के ८५ टक्के ८७ टक्के ९० टक्के ९४ टक्के (आतापर्यंत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.