अनधिकृत बांधकामांवर पालिकेची धडक कारवाई
घणसोली, कोपरखैरणे परिसरातील इमारतींचे पाडकाम
वाशी, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर पवित्रा घेतला आहे. अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या वतीने घणसोली आणि कोपरखैरणे परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये पालिकेच्या कारवाईबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत.
घणसोलीतील साळवीनगर भागातील घर क्र. १६६ येथे घरमालक रतन रामा म्हात्रे आणि विकसक राजेंद्र शंकर पवार यांनी पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बांधकाम सुरू केले होते. तसेच कोपरखैरणेतील बोनकोडे सेक्टर १२ मधील कुकरेजा रुबीच्या मागे शालिक हल्ल्या नाईक यांनी घर क्र. ११२३ येथे अनधिकृत बांधकाम उभारले होते. या दोन्ही बांधकामांना पालिकेकडून पूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. तरीदेखील संबंधितांनी नोटिशीची दखल न घेता अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते. यामुळे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे तसेच उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने सक्त कारवाई केली. घणसोली विभागातील कारवाईसाठी ५ ब्रेकर, १५ कामगार आणि १ गॅस कटरचा वापर करण्यात आला. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त उत्तम खरात, कनिष्ठ अभियंता प्रवीण विश्वे, अतिक्रमण नियंत्रण विभागातील कर्मचारी, सिडकोचे अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस पथक सहभागी झाले होते. दरम्यान, कोपरखैरणे विभागातील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त भरत धांडे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे यांच्यासह नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्त उपस्थित होता. या मोहिमेत नऊ मजूर, तीन इलेक्ट्रॉनिक हॅमर, दोन गॅस कटर आणि एक पिकअप व्हॅनचा वापर करून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाकडून होत असलेल्या कारवाईमुळे शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार नोटीस देऊनही दखल न घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची पालिकेची स्पष्ट भूमिका आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.