राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेरसर्वेक्षण
आशीष शेलार : तीन महिन्यांत नोंदीच्या अहवालाची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी आज जाहीर केले. यासंदर्भात शेलार यांनी तज्ज्ञांसोबत बैठक घेऊन बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेतला. येत्या तीन महिन्यांमध्ये याचा प्राथमिक सर्वेक्षणाचा राज्यातल्या सर्व बारवांच्या नोंदीचा स्पष्ट अहवाल येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा ३,०००च्या वर बारव असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. यामध्ये ऐतिहासिक मूल्ये आहेत. ज्या पद्धतीचे स्थापत्यशास्त्र वापरले आहे त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ आहे. जलसंवर्धन आणि जलसंधारणाचे कार्यही होत आहे. त्या पाण्याची उपयोगिताही झाली पाहिजे. म्हणून राज्यभरातल्या जिल्हावार असलेल्या या सगळ्या बारव आणि त्या बारवांच्या नोंदणी याची आवश्यकता लक्षात येते. त्यामुळे या बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्टे आणि हेतूदर्शित केलेला नव्याने शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचे दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. शासकीय नोंदीही केल्या जाणार आहेत. जिल्हा तज्ज्ञांनी काम केल्यावर या बारवांचे जतन, संवर्धन आणि उपयोगिता होईल. याचे मार्गदर्शन आपण त्यामध्ये घेणार आहोत, असेही ते म्हणाले.
जनजागृती मोहीम
सर्वेक्षणातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर यापुढे जिल्हासह राज्यभरात यांची उपयोगिता आणि याचे जतन, संवर्धन कसे केले पाहिजे, ते लोकसहभागातून. विद्यार्थी असेल, जिल्हाधिकारी असेल, जिल्ह्यातले तज्ज्ञ असतील यांचा जनतेमध्ये माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी पथनाट्य किंवा अन्य कुठला प्रकार असेल, या पद्धतीने त्याची कार्यपद्धतीसुद्धा स्पष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.