मुंबई

पितृपक्षात घरोघरी पितरांचे आवाहन

CD

पितृपक्षात घरोघरी पितरांना आवाहन
२१ सप्टेंबरपर्यंत चालणार श्राद्ध विधी
पनवेल, ता. १४ (बातमीदार) ः अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्याताल कृष्ण पक्ष सुरू होतो. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून भाद्रपद अमावस्येपर्यंतच्या काळाला हिंदू धर्मातील महत्त्वाचा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा म्हणतात. यंदा पितृपक्ष ७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत आहे. या काळात कावळ्याला महत्त्व आहे. परंतु पनवेल परिसरातील कावळ्यांची संख्या रोडावली आहे. त्यामुळेच हा विधी करताना गायीला घास भरवावा लागत आहे.
या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय असे विधी केले जातात. पितृपक्षात केलेल्या तर्पणामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कायम सुख-शांती नांदते, असे मानले जाते. पूर्वजांच्या मृत्यूची जी तिथी असेल त्या तिथीला पितृपक्षात श्राद्ध केले जाते. याला महालय असे म्हणतात. ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नसते किंवा त्या तिथीला महालय करणे शक्य होत नाही त्यांचा महालय सर्वपित्री अमावस्येला (भाद्रपद अमावस्या) केला जातो. पूर्ण पितृ पंधरवड्यात महालय करणे शक्य न झाल्यास पंचागात दिलेल्या महालय समाप्तीच्या कालावधीपर्यंत श्राद्ध करता येते. महालय श्राद्धाच्या माध्यमातून पूर्वजांना आजही कुटुंबाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगितले जाते. ही परंपरा प्राचीन काळापासून पाळली जात.
............
मोबाईल टॉवरमुळे कावळ्यांच्या संख्येत घट
मागील काही वर्षांत पनवेल आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वृक्षतोड झाली आहे. उत्पादन वाढीबरोबच पिके जगावी, यासाठी शेतात मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत आहे. हे कीटकनाशक खाऊन शेतात उंदिर मरतात. या उंदरांना कावळे खात असल्यामुळे कावळ्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर मोबाइल टॉवर व प्रदूषण यामुळेही दिवसेंदिवस कावळ्याच्या संख्येत घट होत आहे.

..................
चौकट
चिंता नको, बिनधास्त खरेदी करा!
पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्राद्धाच्या १६ दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात. या दिवसांमध्ये पिंडदान आणि तिलांजली अर्पण करून पितरांना संतुष्ट केले जाते. पितृपक्षात पूर्वज विशेष पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे. पितृपक्षाचे १६ दिवस अयोग्य मानले जातात. या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री केली जात नाही. विवाहाचे मुहूर्तही टाळले जातात, परंतु या समजुती चुकीच्या आहेत. याच काळात पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असल्याने खरेदी-विक्री करण्यास हरकत नाही. आपले व्यवहार पूर्ववत ठेवून जुन्या चालीरीतींना फाटा द्यावा. १६ दिवस खरेदी-विक्री बंद करता मग जेवण का बंद करीत नाहीत, असा प्रश्नही ज्योतिषाचार्य विवेक देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी कधीही पुरस्कार विकत घेतले नाही' ट्रोलर्संना अभिषेकचं उत्तर, म्हणाला...'मी मेहनतीनं सन्मान मिळवलाय '

IND vs AUS 2nd T20I Live : W,W,W,W! भारताने १२ धावांच गमावल्या चार विकेट्स, Josh Hazlewoodने केला करेक्ट कार्यक्रम

Aadhaar Card Update : आधार कार्डबाबत हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; UIDAI ला दिला 'हा' आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्याच्या टाकीत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

राज ठाकरेंना मारण्यासाठी बेस्टची बस हायजॅक केली अन्... ; रोहित आर्या प्रकरणानंतर अनेकांना १७ वर्षांपूर्वाच्या 'त्या' थरारक घटनेची आठवण

SCROLL FOR NEXT