मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

पोस्को महाराष्ट्र स्टील तर्फे शेतकऱ्यांचा पुण्यात अभ्यास दौरा
माणगाव, ता. १५ (वार्ताहर) ः पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या सीएसआर उपक्रमांतर्गत, गोरेगांव आणि इंदापूर विभागातील प्रगतशील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा पुणे येथील अभिनव फार्मर्स क्लब येथे १२ ऑगस्ट व ९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्याचा प्रमुख उद्देश शेतकऱ्यांना नव्या शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणे, शेतकऱ्यांना रासायनिक खत वापराकडून सेंद्रिय शेतीकडे वळवणे तसेच त्यांच्या उत्पन्नात आणि उत्पादनात वाढ कशी करावी, याची माहिती देणे हा होता. पहिल्या टप्प्यात कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती माणगांव यांनी निवडलेले १६ प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले, तर दुसऱ्या टप्प्यात माणगांव मधील रायगडचा शेतकरी राजा एफपीओमधील १४ शेतकऱ्यांनी दौरा केला. यात ८ महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. अभिनव फार्मर्स क्लब हा सेंद्रिय शेतीचा अग्रणी असून, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्याचे मार्गदर्शन येथे केले जाते. या दौऱ्यात शेतकऱ्यांना पॉलीहाऊस तंत्रज्ञान, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा वापर कमी करून उत्पादनात वाढ कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एक एकर शेतीत विविध प्रकारची पिके घेऊन उत्पादन वाढविण्याचे मॉडेलही शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. अभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सेंद्रिय शेती व बाजारपेठेत उत्पादनाला चांगला भाव मिळविण्याच्या पद्धती समजावून सांगितल्या. त्यांनी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले.
..................
शहीद डॉक्टर दाभोळकर स्मृतीप्रित्यर्थ शालेय स्पर्धा
पेण (बातमीदार) ः शहीद डॉ. दाभोळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शालेय स्पर्धाचे आयोजन केले होते. यामध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेत १२ माध्यमिक शाळांनी व ९२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील निबंध स्पर्धेतील विजेत्यामध्ये प्रथम श्रेया हरिश्चंद्र म्हात्रे, ठाकूर विद्यालय वडाव, द्वितीय वेदिका कृष्णा म्हात्रे जय किसान विद्यामंदिर वडखळ, तृतीय रिद्धी अजित ठाकूर न्यू इंग्लिश स्कूल, चित्रकला स्पर्धेत प्रथम श्रेया हरिश्चंद्र म्हात्रे ब. ग. ठाकूर विद्यालय वडाव, द्वितीय वेदिका कृष्णा म्हात्रे जय किसान विद्या मंदिर वडखळ, तृतीय रिद्धी अजित ठाकूर न्यू इंग्लिश स्कूल,
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम हार्दिक जयेंद्र पाटील सार्वजनिक विद्यालय रावे, द्वितीय गिजल रमेश म्हात्रे बाल गंगा विद्या मंदिर चुनाभट्ट जिते, तृतीय कार्तिकी विकास पाटील बाल गंगा विद्या मंदिर चुनाभट्टी जिते, सर्व विद्यार्थ्यांना पेण शाखेच्या वतीने रोख पाचशे रुपये व ट्रॉफी तसेच चळवळीची पुस्तके देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन साधून डॉ. नरेंद्र दाभोळकर लिखित पाच पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. बक्षीस वितरण प्राचार्य सतीश पोरे यांच्या हस्ते झाल्यानंत मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. एन. ए. पाटील यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.............
भारत पाक क्रिकेट सामन्या विरोधात निदर्शने
पेण (वार्ताहर) : पहलगाम येथील घटनेनंतर रविवारी झालेल्या पाकिस्तानबरोबर भारताच्या क्रिकेट सामन्याला केंद्रातील मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे भारत- पाक क्रिकेट सामन्याला विरोध दर्शविण्यासाठी पेण तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने नगरपालिका चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे, महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश म्हात्रे, जगदीश ठाकूर, महानंदा तांडेल, वैशाली समेळ, चेतन मोकल, योगेश पाटील, संतोष पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे यांनी सांगितले, की एकीकडे निरपराध नागरिकांना मारून देशातील महिलांचे कुंकू पुसल्या जाणाऱ्या पाकिस्तानकडून हल्ले करण्यात येत आहेत. त्याच पाकिस्तानसोबत क्रिकेटचे सामने खेळवणे हे केंद्र शासनाला न शोभणारे आहे. राज्यातील महिला आघाडी याचा निषेध करत असून सिंन्दुर एकत्र करून पोस्टाद्वारे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तर केंद्र शासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढत हे निर्दयी आणि असंवेदनशील सरकार केवळ सट्टेबाज्यांच्या दबावाला बळी पडून त्यांच्या तालावर नाचणारे आहे.
.................
काँग्रेस नेते अशोक मोरे यांच्या खांद्यावर श्रीवर्धनची जबाबदारी
रोहा (बातमीदार) ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील काँग्रेस आय पक्षाला बळकटी मिळावी, या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघाची प्रभारी पदाची जबाबदारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील बहुचर्चित आणि एकेकाळी काँग्रेस आय पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील प्रभारी पदाची जबाबदारी पक्षाचे ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते अशोकराव मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव मोरे यांचा रायगड जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असून त्यांनी पर्यावरण क्षेत्रात उतुंग कामगिरी केली आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या खांद्यावर प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी दिल्यानंतर घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवसापासून ते श्रीवर्धन, म्हसळा, माणगांव, तळा आणि रोहा या मतदार संघातील कार्यक्षेत्राचा दौरा करणार आहे. यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करून पक्ष संघटना बळकटी विषयी चर्चा विनिमय करून मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत व सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळावे म्हणून नेते अशोकराव मोरे हे दौरा करून आपले कार्य अहवाल वरिष्ठ मंडळीकडे सादर करणार आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT