गायमुख घाटात पुन्हा कोंडी
अवजड वाहन पडले बंद
ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) : ठाणे-घोडबंदर वाहिनीवर गायमुख घाटात गुजरातकडे जाणारे अवजड वाहन बंद पडल्याने पुन्हा कोंडी झाली होती. घाटात पडलेले खड्डे आणि सुरू असलेल्या पावसामुळे कोंडी दूर होण्यासाठी बराच वेळ लागला; मात्र वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी नाव घेऊन बंद पडलेले उजळ वाहन हायड्रा क्रेनच्या मदतीने बाजूला केले. त्यामुळे काही तास झालेली घाटावरील वाहन कोंडी दूर झाली.
ठाण्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यातच घोडबंदर मार्गासह गायमुख घाटात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या महामार्गावर विविध प्रकारची कामेदेखील सुरू आहेत. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी असते. त्यातच गायमुख घाटावरदेखील खड्डे पडले असून, या खड्ड्यांतून वाहने पार करताना वाहनचालकांना तारेवरचे कसरत करावी लागते. घाटात प्रचंड लांबीचे खड्डे पडले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्यासाठी केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे. खड्ड्यात खडी टाकून त्यावर नावापुरते डांबर टाकण्यात आले आहे. अशा प्रकारे भरलेले खड्डे काही तासांत उखडून गेल्यामुळे पुन्हा हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
घाटात पडलेल्या खड्ड्यांमधून वाहने चालवताना प्रचंड सावधानता बाळगावी लागत असून, खड्ड्यांमुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. रविवार (ता. १४) घाटावर जेएनपीटी बंदरामधून मालवाहक अवजड वाहन गुजरातकडे जात असताना घाटावर बंद पडले. त्यामुळे येथे काही वेळ वाहतूक कोंडी झाली; मात्र वाहतूक विभागाचे कर्मचारी जयदत्त मुंडे यांनी तत्परता दाखवून हायड्रा आणि क्रेनच्या मदतीने बंद पडलेले वाहन बाजूला केले. त्यामुळे हा घाट पुन्हा काही वेळातच वाहतुकीसाठी सुरू झाला. वारंवार घाटात खड्डे पडत असल्यामुळे आधुनिक पद्धतीने घाटाची गुणवत्ता टिकवणारे दुरुस्ती काम होणे गरजेचे असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.