मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

CD

आयसीएल शाळेत उत्साहात ‘हिंदी दिवस’ साजरा
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : तुर्भे येथील आयसीएल्स मोनामि विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी भाषण, कविता, दोहा, नाटकाद्वारे हिंदीचे महत्त्व अधोरेखित केले. संचालिका सीता राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षकांनी हिंदीसोबत मातृभाषेच्या जतनाची आवश्यकता पटवून दिली. राव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हिंदीचे राष्ट्रीय एकात्मतेतील योगदान अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले तर राकेश सिंग यांनी आभार मानले. अखेर राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण शाळेत दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
..............
विजयादशमी निमित्ताने गौतम बुद्ध स्मारक परिसरात रोशनाईची मागणी
तुर्भे बातमीदार ः नेरूळ सेक्टर २६ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’मध्ये उभारलेल्या गौतम बुद्ध स्मारक परिसरात विजयादशमीनिमित्त आकर्षक विद्युत रोशनाई, फुलांची सजावट व धम्मपूजन व्हावे, अशी मागणी समाजसेवक विकास सोरटे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. जुलैमध्ये अनावरण झालेल्या ध्यानमग्न बुद्धाच्या भव्य पुतळ्यामुळे परिसर नवी मुंबईचे आकर्षणकेंद्र ठरला आहे. समता, करुणा आणि मैत्रीचे प्रतीक असलेल्या स्मारकाभोवती धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी रोशनाई महत्त्वाची असल्याचे सोरटे यांनी नमूद केले. या मागणीसाठी स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत असून स्मारक परिसर अधिक आकर्षक करण्यावर भर दिला जात आहे.
......................
श्रमिक रामदास सोसायटीची यशस्वी वाटचाल – रामदास डोके
तुर्भे (बातमीदार) ः वाशी येथील मुख्य शाखेत श्रमिक रामदास को-ऑप. क्रेडिट सोसायटीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. संस्थापक रामदास डोके यांनी सभेत बोलताना, सभासदांचा निधी विश्वस्त म्हणून योग्य नियोजनाने वापरणे हे आमचे पहिले कर्तव्य आहे. श्रमिक व दुर्बल घटकांना कर्ज पुरवठा करून मुख्य प्रवाहात आणणे हे सोसायटीचे ध्येय आहे, असे प्रतिपादन केले. या सोहळ्यात अध्यक्षा शारदा डोके, किरण झोडगे, के. आर. चौधरी, डॉ. शिल्पा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. मोठ्या नफ्यामुळे सोसायटीची वाटचाल यशस्वी असल्याचे डोके यांनी नमूद केले.
................
खड्ड्यांविरोधात उपोषणाचा इशारा
नेरूळ बातमीदार ः सीवूड्स परिसरातील रस्त्यांची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आठ दिवसांत रस्त्यांची डागडुजी न झाल्यास १९ सप्टेंबर रोजी गायमुख चौकात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचाही धोका वाढला आहे. रस्त्यांच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे नागरिकांचे मत आहे. स्थानिकांच्या मागणीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
........
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा
खारघर (बातमीदार) : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करण्यात यावा, असे राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने पनवेल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. निजाम सरकारच्या हैदराबाद गॅझेटीयरमध्ये बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्ग मानले असून देशातील अनेक राज्यांनी त्यांचा समावेश अनुसूचित जमातीत केला आहे. महाराष्ट्रात मात्र समाजाला विमुक्त भटक्या प्रवर्गात आरक्षण मिळते. त्यामुळे राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करून समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात समाजकार्यकर्त्यांनी आमदार विक्रांत पाटील यांचीही भेट घेऊन निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT