मुंबई

पालघरमध्ये नवसाक्षर परीक्षेसाठी २६ हजार ४५५ परीक्षार्थी

CD

पालघर, ता. १७ (बातमीदार) : २०२७ पर्यंत पालघरला पूर्णपणे साक्षर करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ही राज्यस्तरीय परीक्षा रविवारी (ता. २१) होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण २६ हजार ४५५ प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये १८ हजार ११ नवीन प्रविष्ट, तसेच २३ मार्च रोजी झालेल्या परीक्षेस गैरहजर राहिलेले व संपादन सुधारणा आवश्यक असणारे आठ हजार ५२४ नवसाक्षरांचा समावेश आहे. या परीक्षेच्या पूर्वतयारीचा, तसेच जिल्ह्यातील नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियामक परिषदेची बैठक पार पडली.

नवसाक्षरांना शेतीच्या ७/१२ उताऱ्याचे वाचन करता यावे, यासाठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात यावे. लवकरच स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले. २०२७ अखेर पालघर जिल्हा पूर्णपणे साक्षर करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व समाजातील घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी बैठकीत केले.

पालघर जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्येदेखील नवसाक्षरांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. सर्व परीक्षार्थी नोंदणी झालेल्या शाळेत परीक्षा देणार असून त्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर केंद्र संचालक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच परीक्षा तारखेपर्यंत उल्लास पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू राहणार आहे. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकास अधिकारी प्रशांत भामरे, समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, महिला व बालविकास अधिकारी व्ही. एम. हंडेकर, जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, महिला व बालविकास अधिकारी रेणुका तमलवार उपस्थित होते. शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.


मागील परीक्षांचा आढावा
वर्ष परीक्षार्थी उत्तीर्ण
२०२३-२४ १३,३४० १२,६२३
२०२४-२५ २५,३३० २५,१६७

नवसाक्षर परीक्षेचे उमेदवार
तालुका परीक्षार्थी
डहाणू ७,३६९
जव्हार २,४२९
मोखाडा ७३५
पालघर ३,९५०
तलासरी ३,१९३
वसई ५,३६३
विक्रमगड १,६२८
वाडा १,७८८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT