ज्वारीचा ट्रक दुभाजकाला धडकला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील घटना, दोघे गंभीर जखमी
पनवेल, ता.१७ (वार्ताहर): कर्नाटकातून ज्वारी घेऊन मुंबईच्या दिशेन जाणारा ट्रक दुभाजकाला धडकल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रकचालकाचा मृत्यू झाला आहे. तर सहाय्यक गंभीर जखमी आहे. मंगळवारी सकाळी पनवेलजवळ ही घटना घडली.
कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून ज्वारीने भरलेले पोती घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या ट्रकला मंगळवार (ता.१६) सकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील पनवेल येथील टेंभोडे गावाजवळ वेगातील ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले.
लोखंडी गर्डरवर धडकल्याने ट्रक थेट पुलावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात चालक, दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चालक अमजद अली मकानदारला मृत घोषित केले.
---------------------------
ट्रक चालकावर गुन्हा
या घटनेत ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चालकाने भरधाव वेगात ट्रक चालवल्यामुळे अपघात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे खांदेश्वर पोलिसांनी मृत ट्रक चालक अमजद अली मकानदार याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २७९, १२५(अ), १२५(ब), ३२४ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.