मुंबई

प्रभाग रचनेवरुन शिंदेसेना-भाजप आमनेसामने

CD

प्रभागरचनेवरून शिंदेसेना-भाजप आमनेसामने
अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १७ ः महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेत भाजप नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये फूट पडली आहे. चार नगरसेवकांचा एक प्रभाग तयार करण्याच्या नादात प्रशासनाच्या गोंधळामुळे शिवसेनेचे शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आले आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती आणि सुनावण्या घेण्यात आल्या. या प्रक्रियेत दोन हजार ५५१ हरकती नोंदवण्यात आल्या. शिवसेनेचा ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार गटासोबत भाजपच्या नगरसेवकांनी सर्वाधिक हरकती घेतल्या आहेत. या रचनेमुळे २० वर्षांहून अधिक काळ नगरसेवक असलेल्या माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. चार प्रभागांचा एक प्रभाग करण्याच्या प्रशासकीय कामात अनेकांचे प्रभाग विचित्र पद्धतीने फुटल्याने मतदानावर त्याचा परिणामाची ओरड भाजपकडून होत आहे. माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी प्रभागरचनेच्या व्याप्तीसह नकाशातील चुकांवर बोट ठेवले आहे. त्यांना प्रशासनाने नकाशानुसार बदल करण्याचे आश्वासन दिले आहे, तर नेरूळ प्रभाग २५ मध्ये नेरूळ नोडमधील सेक्टर-१,१७, १९, १९ए, २१, २३, २५,२७ आणि दारावे गाव आहेत. सीवूड्स सेक्टर-५०, ५८, ३६ आणि किल्ले गावठाण समावेश करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनीही यावरून हरकती घेतल्या आहेत.
--------------------------------------
नाहीतर मतदानावर बहिष्कार
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा तुर्भे गावात प्रभाग आहे. जुन्या प्रभागातील तुर्भे गावातील परिसर नव्या प्रभागानुसार सानपाड्याला जोडण्यात आला आहे. यामुळे दीड हजार मतदारांचा गोंधळ निर्माण होणार आहे. या भागात एक हजार ३६ मतदारांपैकी ५७७ लोकांनी हरकत घेतली आहे. मूळ गावठाणातील रस्ता ओलांडून जाण्यास सानपाडा येथे जाण्यास सांगितले आहे. जर आमचा प्रभाग बदलला नाही, तर मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा रामचंद्र घरत यांनी दिला आहे.
----------------------------------------
भाजपचे नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत
पालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचा सर्वाधिक फटका भाजपच्या नगरसेवकांना बसला आहे. हरकती घेतल्यानंतरही बदल झाला नाही, तर भाजपचे बहुतांश नगरसेवकांनी पक्ष बदलण्याचा इशारा वरिष्ठांना दिल्याची चर्चा आहे. भाजपचे १२ नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटात बोलले जात आहेत, मात्र भाजपच्या नेत्यांनी त्याला दुजोरा दिलेला नाही.
--------------------------------------------
ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग जाहीर होणार
जानेवारी २०२६ मध्ये नवी मुंबई पालिकेच्या निवडणूक होण्याची शक्यता आहे. आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार हरकती आणि सुनवण्या पूर्ण झाल्या आहेत. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभागरचना जाहीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Latest Marathi News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT