आयएमएच्या बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
१०० हून अधिक रुग्णालये, ५०० डॉक्टर सहभागी
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी २४ तास उपचार सेवा बंद ठेवल्या असून, ५०० पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला. या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयांतील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले.
आयएमएच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले की, “या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवादेखील पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. एमएमसी नोंदणीला आमचा ठाम विरोध असून, हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार आहोत, अशी माहिती कल्याण आयएमए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली. तसेच राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर यापुढे बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत आयएमएचे राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याणातील आयएमएच्या डॉक्टरांनी मुरबाड रोड येथील आयएमए हॉल ते कल्याण तहसील कार्यालय आणि तिथून केडीएमसी मुख्यालय असा पायी लाँग मार्च काढला. डॉक्टरांच्या या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि केडीएमसी आयुक्तांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या वेळी आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ. तन्वी शहा, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. राजेंद्र लावणकर, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. गोडबोले, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. विवेक भोसले, डॉ. विद्या ठाकूर, डॉ. प्रशांत खताळे, डॉ. विकास सुरंजे, डॉ. संदेश रोठे, यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.