नवरात्रोत्सवासाठी ‘इंडो-वेस्टर्न’चा बोलबाला
डोंबिवली, ता. १८ : (बातमीदार) : नवरात्री हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता, तरुणाईसाठी तो एक फॅशन फेस्टिव्हल बनला आहे. पारंपरिक पोशाखांना आधुनिकतेची जोड देत साजरी होणारी ही नवरात्र, शहरातील बाजारपेठांना नवसंजीवनी देत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत पारंपरिक उत्साहाबरोबरच फॅशनची रंगतही वाढत चालली आहे. यंदा तरुणाईमध्ये खासकरून इंडो-वेस्टर्न पोशाखांना मोठी पसंती मिळत असून, बाजारपेठ आणि डिझायनर स्टुडिओंमध्ये या ट्रेंडची चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. घागरा-चोली, कुर्ता-पायजमा यांसारख्या पारंपरिक पोशाखांना यंदा मॉडर्न टच दिला जात आहे. लांब स्कर्टसोबत क्रॉप टॉप, मिरर वर्क असलेले जॅकेट, पलाझोवर स्टायलिश दुपट्टा, हलक्याफुलक्या एम्ब्रॉयडरीसह कॉर्टसेट ब्लाउज यांसारखे पर्याय तरुणाईला आकर्षित करत आहेत.
फ्लोरल प्रिंट्स, पेस्टल शेड्स आणि मिरर वर्क यांचा मेळ असलेले ‘चनिया चोली’ सेट्सही यंदा विशेष मागणीत आहेत. गरब्यासाठी पोशाख पूर्ण करण्यासाठी अॅक्सेसरीजलाही तितकीच मागणी आहे. ऑक्सिडाइज्ड झुमके, कंठमाळा, कमरपट्टे, रंगीबेरंगी बांगड्या, मॅचिंग पायघडे, नेल-आर्ट स्टुडिओमध्ये विशेष डिझाइन्सला मोठी मागणी आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक-युवती याकडे विशेष आकर्षित होत आहेत.
दरवाढ, तरीही उत्साही खरेदी
डिझायनर कपड्यांचा कापड खर्च आणि कामगारांचे मानधन वाढल्याने यंदा कपड्यांचे दर सरासरी पाच ते १० टक्क्यांनी वाढले आहेत. सामान्य पोशाखांचे दर ५०० पासून सुरू आहेत, तर
हायएंड डिझायनर सेट्स १० हजारपेक्षा अधिक दरात एक्सक्लुसिव्ह डिझायन्स स्टुडिओमधून उपलब्ध आहेत. तरीही ग्राहकांचा खरेदीसाठी ओढा कायम असून, अनेक जण ‘हटके’ लूकसाठी सरळ डिझायनर स्टुडिओंना प्राधान्य देत आहेत.
समाजमाध्यमांमुळे ट्रेंड वेगाने पोहोचतो
फॅशन इन्फ्लुएन्सर्स, यूट्युब आणि इन्स्टाग्राम रील्सवरून प्रेरणा घेणारी तरुण पिढी ‘ग्लॅमरस गरबा लूक’ तयार करण्यासाठी नवनवीन पर्याय शोधत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेंड झपाट्याने बदलतोय आणि त्याला व्यापारीही तत्पर प्रतिसाद देत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.