मुंबई

आगरी कोळी समाजात सर्वपितृ अमावस्याच्या दिवशी पितृ श्राद्ध....

CD

शाकाहरी, मांसाहराचे पूर्वजांसाठी बेत
सर्वपितृ अमावस्येनिमित्त आगरी कोळी समाजात प्रथा
तुर्भे, ता. २०(बातमीदार): अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. पितृ पक्षात काही समाजात तिथीनुसार पितरांना नैवैद्य दाखवतात. पण नवी मुंबईसह ठाणे, उरण परिसरात राहणारा आगरी कोळी समाज पितरांना शाहाकारी किंवा मांसाहराचा नैवैद्य दाखवतो. पूर्वजांपासून सुरु केलेली ही प्रथा आजही नव्या पिढीकडून जोपासली जात आहे.
सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी घरातील महिला सकाळ पासूनच गोडधोड, शाहाकारी, मांसाहारी असे दोन्ही पदार्थ बनविण्याच्या तयारीला लगातात. गोड पदार्थ म्हणजे ओल्या नारळाच्या उकडीच्या किंवा तळणीच्या करंज्या, पुरणपोळी, खीर, वडे अळूवडी, भजी तसेच सात किंवा अकरा प्रकरच्या गावरान भाज्यांचा समावेश असतो. सगळ्या भाज्या एकत्रित करून मिश्र भाजी बनवली जाते. त्यानंतर आळुवडी, भजी, डाळ भात, भाकरी आदी बनवले जाते. तर मांसाहारमध्ये चिकन, मटण चिंबोरी, कोलंबी अशा वेगवेगळे मासळीचे प्रकार बनवले जातात. तर वारकरी पंथातील असेल तर त्यांना पूर्ण सात्विक असे शुद्ध शाहाकारी जेवण बनवले जाते. त्यामध्ये वरण भात, मिश्र भाजी, दही, श्रीखंड, खीर, मिठाई भाज्या, पुरण पोळी, वडे असा शुद्ध शाहाकारी बेत असतो.
----------------------------
शहरीकरणाचा प्रभाव
नवी मुंबई शहरातील मूळ निवासी असलेल्या आगरी-कोळी समाज हा पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सर्वपितृ अमावस्याच्या दिवशी पूर्वपरंपरानुसार पितरांना नैवद्य दाखवतो. आगरी कोळीबोली भाषेत सर्वपितृ अमावस्येला ‘कावकाव’ असे संबोधले जाते. सध्या शहरीकरण झपाट्याने झाल्याने भातशेती, घरातील परसातील जागा नसल्यामुळे घराच्या छतांवर पितरांना नैवैद्य दाखविला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT