मुंबई

उत्पादनक्षमता वाढीसाठी अनुदानावर कृषी साहित्य

CD

उत्पादनक्षमता वाढीसाठी अनुदानावर कृषी साहित्य
ऑनलाइन अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत करण्याचे पंचायत समितीचे शेतकऱ्यांना आवाहन
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर व कृषी अधिकारी मिलिंद चौधरी यांनी केले आहे. आतापर्यंत पनवेल तालुक्यातून ६० शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे आणि साहित्य खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये पाच अश्वशक्ती क्षमतेचा ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच, ९० मी. मी. पीव्हीसी पाइप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप, ताडपत्री आदी वस्तू खरेदी करता येणार आहेत. या योजनेद्वारे शेती उपयोगी तसेच जोड व्यवसायासाठी वस्तूंवर अनुदान दिले जाते. त्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे बँकेत जमा केले जाते. शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून https://zppunecessyojana. com/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
..................
चौकट
अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे
फोटो, आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ-अ दाखला, रेशन कार्ड, छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला, स्वयंघोषणापत्र, बँक पासबुक, पीव्हीसी पाइपसाठी पाणी परवाना अथवा सात-बारावर विहिरीची/शेततळ्याची/बोरवेलची नोंद असलेली प्रत अपलोड करावी. मोटार पंप संचासाठी अर्जदाराने सिंचन सुविधेची नोंद, वीजबिल जोडावे.
................
कोट
या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी आणि शेतीसाठी लागणारी मूलभूत साधने कमी खर्चात मिळणार आहेत. ही योजना पूर्णपणे ऑनलाइन आहे. यामुळे अधिक पारदर्शकता आणि गरजू मदत संधी मिळेल. ही योजना केवळ शेतकरी हिताची नसून उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची आहे.
-समीर वाठारकर, गटविकास अधिकारी पनवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: अरे कॅच घेतला रे! संजू सॅमसनने जमिनीलगत झेलला चेंडू, पाकिस्तानी फलंदाजही झाला शॉक; पाहा Video

हुंड्यासाठी विवाहितांचा वाढतोय कौटुंबिक छळ! ‘माहेरहून पैसे आण नाहीतर मूल होऊ देणार नाही’, सासरच्यांची विवाहितेला धमकी; पैशासाठी मेव्हण्याचे तुकडे करण्याची पतीची धमकी

Nashik Accident:'वाहन पलटी हाेऊन १ ठार तर ११ गंभीर जखमी'; सप्तशृगी वणी गडावर ज्याेत नेण्यासाठी जाताना घडली घटना, नेमकं काय घडलं..

Teacher Transfer Emotional : मॅडम, तुम्ही जाऊ नका! विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा; बीबीदारफळ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेसाठी चिमुकले भावूक

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT