मुंबई

नवी मुंबईतील आयुष रुग्णालयाची रखपडपट्टी

CD

नवी मुंबईतील आयुष रुग्णालयाची रखडपट्टी
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबईमध्ये आयुष रुग्णालय व परिचारिका महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाला दीड वर्ष उलटल्यानंतरही अद्याप मुहूर्त न मिळाल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. नवी मुंबईकरांकडून दोन्ही आरोग्यसेवा कधी सुरू होतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आयुक्तांनी आयुष रुग्णालय सुरू करण्याची योजना मांडली होती. तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू करून पालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांची कमतरता भागविण्याचा मानस व्यक्त केला होता; मात्र २०२४-२५ व २०२५-२६ या दोन अर्थसंकल्प वर्षांनंतरदेखील याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. नवी मुंबई पालिकेच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांमध्ये विविध प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध असून, यासोबतच आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस पालिकेचा आहे. आयुर्वेदिक रुग्णालय स्थापनेसाठी जागा उपलब्ध झाल्यावर दोन रुग्णालये सुरू करण्याचे प्रस्तावित होते. तसेच परिचारिका महाविद्यालय सुरू करून नर्सिंग कर्मचाऱ्यांची गरज भागविण्याचा निर्णयही अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला होता.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावदे यांनी सांगितले, की आयुष रुग्णालय व परिचारिका महाविद्यालय लवकरच होणार असून त्याचे काम सुरू आहे. नागरिक आणि आरोग्यतज्ज्ञ या दोन्ही प्रकल्पांना मोठ्या अपेक्षा लावून पाहत आहेत. यामुळे पालिकेने लवकरात लवकर या मुहूर्ताची घोषणा करून कार्यवाही सुरू करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT