मुंबई

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती रॅली

CD

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी जनजागृती रॅली
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) ः डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण व स्वच्छतेबाबत जनजागृती रॅली शनिवारी (ता. २७) सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. औदुंबर कट्टा, सुदर्शननगर येथून सुरू झालेली ही रॅली ज्ञानमंदिर विद्यासंकुल येथे संपली. या रॅलीत १५० विद्यार्थी व ७५ रहिवासी सहभागी झाले होते. ज्ञानमंदीर विद्यासंकुल, के. रा. कोतकर विद्यालय, टिळकनगर कॉलेज, एव्हरग्रीन सायकल ग्रुपच्या महिला सदस्यांनी पावसातही सहभाग दर्शवला. हवा प्रदूषणाविरोधात घोषणा व फलकांमुळे जनजागृतीला चालना मिळाली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापिका संगीता पाखले, पर्यावरण दक्षता मंचचे अनिल मोकल आणि रूपाली शाईवाले यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या रॅलीत पर्यावरण दक्षता मंचतर्फे रूपाली शाईवाले, उज्ज्वला केतकर, अनिल मोकल, प्राची कुलकर्णी, सुदर्शननगर निवासी संघातर्फे सुरेखा जोशी, विजय सावंत, चंद्रशेखर राईलकर, विवेक पाटील, स्मिता फाटक, मिलापनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनतर्फे वर्षा महाडिक, अरविंद टिकेकर, राजू नलावडे, माया परांजपे, डॉ. मनोहर अकोले, अरुण जोशी, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपतर्फे हर्षल सरोदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी; अनेकांचा मृत्यू

Rupali Chakankar Video : चारित्र्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांना रूपाली चाकणकरांचं कडक शब्दांत उत्तर; जाणून घ्या, काय म्हणाल्या?

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

SCROLL FOR NEXT