मुंबई

सुविधांयुक्त समुद्रकिनारे

CD

प्रसाद जोशी, वसई
वसई तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. डोंगरदऱ्या आणि समुद्र असा संगम आहे. त्यामुळे भ्रमंती करण्यासाठी शहरातील पर्यटकांची पावले नेहमीच वळतात आणि मनसोक्त आनंद घेत आठवणीची शिदोरी पाठीशी बांधून परतीच्या मार्गावर जातात. याच वसईतील समुद्रकिनारी पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात सुविधांयुक्त किनारे पर्यटकांनी फुलणार आहेत.

ऐतिहासिक किल्ला, अथांग समुद्र आणि हिरवाईचा आनंद घेत पर्यटक, इतिहास अभ्यासकांची वसईला नेहमीच पसंती असते. समुद्रकिनारी त्यांना अधिकाधिक सुविधांचा लाभ मिळावा, पर्यटकांची संख्या वाढावी व स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती व्हावी, म्हणून वसई-विरार महापालिकेने अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार लवकरच वसई सुरुची बाग समुद्रकिनारा विकसित केला जाणार आहे.

मुंबई, ठाणे परिसरातून वसई-विरार उप-प्रदेशात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील समृद्ध इतिहास, सांस्कृतिक विविधता, नैसर्गिक सौंदर्य असल्याने हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. येथे पर्यटन विकासाची मात्र कमतरता आहे. अस्वच्छ किनारे असल्याने पर्यटकांना असुविधांचा सामना करावा लागतो, अशी परिस्थिती असते. सुविधा नसल्याने नागरिकांडून अनेकदा नाराजीदेखील व्यक्त केली जाते. पर्यटन विकास आराखड्यानुसार काही ठरावीक पर्यटनस्थळे समोर आली आहेत, ज्यामध्ये वसई सुरुची बाग किनाऱ्याचा समावेश आहे. येथील जमीन, स्थानिकांना व्यवसायासाठी कोणते फायदे होणार, रोजगार व पर्यटक कसे वाढतील, याकडे महापालिका प्रशासन लक्ष देणार असून, त्यानुसार अभ्यास केला जात आहे. आयुक्तांनी नुकतेच शहर अभियंत्यांना याबाबत एकत्रित माहिती जमा करून पर्यटन विकास कसा होईल, याचा आढावा घेण्यास सांगितले आहे.

२५ रोपांची लागवड
समुद्रकिनारी सुरुची बाग आहे, मात्र अधिकाधिक वृक्ष बहरावेत, यासाठी महापालिकेने रोपांच्या लागवडीचा श्रीगणेशा नुकताच केला आहे. किनारी भागात एकूण २५ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाला हातभार लागणार असून, पर्यटकांना निसर्गाची अनुभूती घेता येणार आहे.

प्रवास घटल्याने ओघ वाढणार
वसई जेट्टी येथे रो-रो फेरी बोट सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकडे ये-जा करण्यासाठी प्रवास कमी वेळेत करता येतो. जर सुरुची बाग समुद्रकिनारे विकसित झाले, तर पर्यटकांचा ओघ निर्माण होऊन फेरी बोट व स्थानिक पातळीवर फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.

रायडिंगचा आनंद
लहान मुलांसह पर्यटक हे किनारी आनंद लुटण्यासाठी येतात. त्यांना किनाऱ्याच्या ठरावीक अंतरावर रायडिंगचा आनंद घेता यावा, यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. त्यानुसार विविध सेवा दिल्या जाणार आहेत. यामुळे भविष्यात स्थानिकांना रोजगार तसेच व्यवसायाची संधी प्राप्त होणार आहे.

वसई गावातील सुरुची बाग समुद्रकिनारी महापालिका प्रशासनाकडून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. यासाठी सविस्तर आढावा घेतला जात आहे. येथे विकास झाल्यावर स्थानिक महसूल वाढेल, स्थानिकांना व्यवसाय तसेच पर्यटकांची संख्या वाढेल.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त

भविष्यातील वाटचाली...
- व्यवसायाला संधी
- स्थानिक रोजगारप्राप्ती
- महसुली उत्पन्न वाढणार
- पर्यावरण संवर्धन
- सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपणे
- स्थलांतर घटणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy: विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी; दहापेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Rupali Chakankar Video : चारित्र्यावर टीका-टिप्पणी करणाऱ्यांना रूपाली चाकणकरांचं कडक शब्दांत उत्तर; जाणून घ्या, काय म्हणाल्या?

Ajit Pawar : अतिवृष्टीचा विचार करून आगामी गळीत हंगाम शुभारंभाचा निर्णय घेणार

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Vani Crime : पतीच्या त्रासामुळे माहेरी आलेल्या पत्नीस पतीनेच कातरीने वार करीत केली हत्या

SCROLL FOR NEXT